बॉलिवूड असो किंवा टिव्ही इंडस्ट्री सेलिब्रिटींच्या अफेअरच्या चर्चा या होतच असतात. पण काही कलाकारांचे नाते फार काळ टिकत नाही. तर काहींच्याबाबतीत फसवणूकीसारखे प्रकराही घडतात. एका अभिनेत्रीच्या बाबतीत अशीच एक घटना घडली आहे. ही अभिनेत्री एका प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्याच्या इतकी अखंड प्रेमात बुडाली होती की, ती स्वत:चे करिअर,घर सगळं काही विसरली होती. तिच्यासाठी तिचे प्रेमच सर्वकाही होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन अभिनेत्री अभिनेत्याशी लग्न करायला तयार होती. मात्र तिला जेव्हा त्या अभिनेत्याकडून प्रेमात फसवणूक मिळाली तेव्हा मात्र ती पूर्णपणे तुटली अन् डिप्रेशनमध्ये गेली.
काव्यांजलीच्या सेटवर झालेली मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली.
ही अभिनेत्री आहे अनिता हसनंदानी. अनिता तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 2013 मध्ये तिने रोहित रेड्डीशी लग्न केलं. अनिता आता एका मुलाची आई आहे. अनिताचे मुस्लिम अभिनेता एजाज खानसोबतचे प्रेमसंबंध आणि ब्रेकअप देखील चर्चेत आहे. दोघांची भेट काव्यांजली शोच्या सेटवर झाली होती. येथूनच त्यांची मैत्री फुलली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.
एजाज खानने एका मुलाखतीत अनिता हसनंदानीला फसवल्याची कबुली दिली होती. राजीव खंडेलवालच्या ‘जझबात’ या शोमध्ये त्याने अनिताला फसवल्याचे कबूल केले होते. कोणाचेही नाव न घेता एजाज म्हणाला होता की, “मी कोणाची तरी फसवणूक करण्याची ही एकमेव वेळ होती. मी एक चूक केली ज्यामुळे माझ्या आयुष्याचे संपूर्ण अर्थच हिरावून घेतला”
करिअरमधील अनेक चांगल्या संधी गमावल्या.
या संदर्भात, अनिताने देखील एका मुलाखतीत सांगितले होते की एजाज तिला बदलण्यासाठी प्रयत्न करत होता. ती म्हणाली की, “असे नव्हते की एजाजने मला जबरदस्ती केली होती पण तो नेहमी म्हणायचा की मला तू चित्रपट करायला नको. मला तू असे सीन करायला नको आहेत. यामुळे मी माझ्या करिअरमधील अनेक चांगल्या संधी गमावल्या. त्यावेळी माझ्यासाठी प्रेम जास्त महत्त्वाचे होते. मला आता पश्चाताप होतोय. प्रेमात, तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी अनेक गोष्टी करता.”
ब्रेकअपनंतर अनिता डिप्रेशनमध्ये गेली होती
अनिताने पुढे सांगितले की, एजाजसोबतच्या ब्रेकअपनंतर ती खूप दुखावली होती. ती या नात्यात गंभीर होती. ती तिच्या नात्यासाठी तिच्या आईच्या विरोधातही गेली होती. एजाज मुस्लिम असल्याने, तिची आई या नात्यावर फारशी खूश नव्हती. मात्र जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा मात्र अनिता डिप्रेशनमध्ये गेली होती. ती म्हणाली होती की, ‘एजाजसोबत ब्रेकअप करणे खूप कठीण होते. या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी तिला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागला होता. पण आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्याता आणि व्यावसायिक आयुष्यात अगदी फोकस असल्याचं दिसून येत आहे.