मुंबई | 20 मार्च 2024 : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध, ब्रेकअप… त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात झालेली नव्या प्रेमाची एन्ट्री… सर्वकाही अंकिताच्या चाहत्यांना माहिती आहे. उद्योजक विकी जैन याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विकी जैन याच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध असताना देखील दोघांनी त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं आणि लग्न केलं.
लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यावर चाहत्यांनी प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. पण आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत. फोटोमध्ये अंकिता पुन्हा विकी याच्यासोबत लग्न करताना दिसत आहे.
अंकिता आणि विकी यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पण दोघांनी पुन्हा लग्न का केलं… याबद्दल कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता आणि विकी यांनी दुसऱ्यांदा केलेल्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
अंकिता आणि विकी यांनी 14 डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. लग्नाआधी अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. दोघांनी त्यांच्या शाही विवाहावर लाखो आणि करोडो रुपये खर्च केले आणि या लग्नाची बरीच चर्चा झाली. आजही दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
भारतात लग्न झाल्यानंतर अंकिता – विकी यांनी परदेशात देखील लग्न केलं. यानंतर सलमान खानने ‘बिग बॉस’मध्ये अभिनेत्रीचं पुन्हा लग्न केले. तेव्हा भाईजानने पुन्हा सात वचनांची आठवण करून दिली. आता पुन्हा दोघांच्या लग्नाची चर्चा होत आहे.
अंकिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.