अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसमध्ये पतीसोबत सहभागी झाली होती. मात्र, अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये बिग बाॅसच्या घरात असताना जोरदार वाद बघायला मिळाला. हेच नाही तर दोघांनीही एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले. अंकिता लोखंडे हिला बिग बाॅसच्या घरात असताना लोक सतत खडेबोल सुनावताना दिसले. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय.
अंकिता लोखंडे हिचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवरून अंकिता लोखंडे हिला खडेबोल सुनावले जात आहेत. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही मित्रांसोबत जेवण करत असताना अचानक उठते आणि थेट डान्स करण्यास सुरूवात करते. यावरून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. हेच नाही तर तिला मानसिक आरोग्याबद्दलही भाष्य करण्यात आले.
सतत अंकिता लोखंडे हिला या व्हिडीओवरून ट्रोल केले जातंय. एकाने लिहिले की, या अंकिता लोखंडेची मला मेंटल हेल्थ अजिबात व्यवस्थित वाटत नाही. हा व्हिडीओच नाही तर बिग बाॅसच्या घरात ती ज्या पद्धतीने वागली, त्यावरून मला ही वेडीच दिसते. अनेक लोक सतत या व्हिडीओवरून अंकिता लोखंडेच्या मजाक उडवताना दिसत आहेत.
काही लोक तिचा मजाक उडवत आहेत, तर दुसरीकडे मात्र, तिचे चाहते तिचा सपोर्ट करताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ रिशेअर करत अंकिता लोखंडे हिने तिच्या चाहत्यांचे आभार मानल्याचे दिसत आहे. हेच नाही तर यासोबतच अंकिता लोखंडे हिने लिहिले की, तिला डान्स करायला आवडते आणि तिला तिच्यातील लहानपण जिवंत ठेवायला आवडते.
मुळात म्हणजे बिग बाॅस 17 मध्ये बाहेर पडल्यापासून सतत अंकिता लोखंडे हिला सोशल मीडियावर खडेबोल सुनावले जात आहेत. अंकिता लोखंडे हिच्या सासूने देखील अंकिता लोखंडेबद्दल मोठे भाष्य केले होते. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते, चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.