मुंबई : अंकिता लोखंडे ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही प्रेग्नंट आहे. या चर्चांनंतर अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांमध्येही मोठे आनंदाचे वातावरण हे बघायला मिळाले. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन याच्यासोबत खास फोटोशूट केले.
नुकताच आता अंकिता लोखंडे हिने प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर माैन सोडले आहे. अखेर अंकिता लोखंडे हिने या चर्चां मागील सत्य सांगितले आहे. अंकिता लोखंडे हिचे काही फोटो व्हायरल होत होते. विशेष म्हणजे या फोटोमध्ये बेबी बंप दिसत असल्याने चर्चा सुरू झाली. या फोटोमध्ये अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा देखील दिसत होता.
अंकिता लोखंडे म्हणाली की, या गोष्टींची आता सवय झालीये. जेंव्हा लग्न झालेले नसते, त्यावेळी लोक लग्नाबद्दल प्रश्न विचारतात आणि लग्न झाल्यानंतर प्रेग्नंसीबद्दल. मुळात म्हणजे मी अशी पहिली अभिनेत्री नाही की, या गोष्टी होत आहे. सर्वांसोबतच होतात. या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. माझ्या काही फोटोंमध्ये चेंज करण्यात आले. त्या फोटोंमध्ये बेबी बंप दिसत आहे. पण ठिक आहे, या गोष्टी सुरूच राहणार आहेत.
मुळात म्हणजे मलाही फोटो पाहूनच कळाले की, अशा काही चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा ही तूफान रंगताना दिसत आहे की, अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार आहे. फक्त अंकिता लोखंडे हिच नाही तर तिचा पतीही तिच्यासोबत सहभागी होईल. यानंतर अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.
बिग बाॅस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही खरोखरच सहभागी होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण यावर अंकिता लोखंडे हिने काहीच भाष्य हे केले नाहीये. मात्र, चाहते हे बिग बाॅसच्या घरात अंकिता लोखंडे हिला पाहण्यास इच्छुक आहेत. अंकिता लोखंडे ही मोठ्या पडद्यावर बिग बाॅस 17 च्या माध्यमातून पुनरागमन नक्कीच करू शकते.
अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही, टीव्ही मालिकांपासून केलीय. अंकिता लोखंडे हिला खरी ओळख ही पवित्र रिश्ता या मालिकेतूनच मिळाली. विशेष बाब म्हणजे अंकिता लोखंडे हिची पवित्र रिश्ता ही पहिलीच मालिका. या मालिकेत अनेक वर्षे अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. या मालिकेत तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतही दिसला.