अंकिता लोखंडे हिच्या सासूबाईचा गाैप्यस्फोट, थेट गंभीर आरोप, अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचे कारण सांगत..

| Updated on: Jan 11, 2024 | 5:20 PM

अंकिता लोखंडे ही सध्या तूफान चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 च्या घरात सहभागी झालीये. अंकिता लोखंडे हिने काही दिवसांपूर्वीच पती विकी जैन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. अंकिता लोखंडे हिने केलेले आरोप ऐकून सर्वचजण हे हैराण झाले.

अंकिता लोखंडे हिच्या सासूबाईचा गाैप्यस्फोट, थेट गंभीर आरोप, अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचे कारण सांगत..
Follow us on

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. बिग बॉस 17 मध्ये नुकताच अंकिता लोखंडे हिची सासूबाई आणि विकी जैन याची आई दाखल झाली. मात्र, विकी जैन हिच्या आईचे बोलणे ऐकून लोक हे चांगलेच हैराण झाले. हेच नाही तर बिग बॉस 17 च्या घरात येऊन सुनेला खडेबोल सुनावताना रंजना जैन या दिसल्या. बिग बॉस 17 मधून बाहेर आल्यावरही सुनेवर गंभीर आरोप करताना विकी जैन याची आई दिसत आहे. हेच नाही तर आता अंकिता लोखंडे हिची पर्सनल लाईफ ही चर्चेत आलीये. आता अंकिता लोखंडे हिच्या आईने देखील या वादात उडी मारल्याचे बघायला मिळतंय.

अंकिता लोखंडे हिची सासू रंजना जैन या अंकिता लोखंडे हिला थेट म्हणतात की, तू जेंव्हा विकी याला लाथ मारली त्यावेळी पप्पांनी लगेचच तुझ्या आईला फोन केला आणि विचारले की, तुम्ही देखील अशीच लाथ पतीला मारत होतात का? हे ऐकून अंकिता लोखंडे ही चांगलीच भडकली आणि म्हणाली की, माझ्या आईला कशाला फोन केला? तुम्ही मला बोला जे काही ते…

माझे वडील आताच वारले आहेत आणि…यानंतर अंकिता लोखंडे ही तिच्या आईकडे तक्रार करताना दिसली. आता नुकताच बिग बॉस 17 मधून बाहेर पडल्यानंतर अंकितावर अजूनही आरोप करताना रंजना या दिसल्या आहेत. रंजना जैन म्हणाल्या की, माझा विकी हा हिरा आहे हिरा…मुलाचे काैतुक करताना रंजना जैन या दिसत आहेत.

बिग बॉस 17 च्या घरात असताना एक वादामध्ये अंकिता लोखंडे हिने विकी जैन याला लाथ मारली होती. ज्यानंतर अंकिता लोखंडे हिच्यावर जोरदार टीका झाली. हिच गोष्ट विकी जैन याच्या घरच्यांना खटकली आहे. मात्र, आता विकी जैन याच्या आईचे बोलणे हे अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांना अजिबातच आवडताना दिसत नाहीये.

विकी जैन याच्या आईला सोशल मीडियावर सतत खडेबोल हे सुनावले जात आहेत. विकी जैन याच्या आईने थेट म्हटले आहे की, काही गोष्टी मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत ही करावी लागते, थोडी काही गोष्टी सहज मिळतात. यासाठी पैसे देखील मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागतात असेही अंकिता लोखंडे हिच्या सासूने थेट म्हटले आहे.