मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी कधीही विसरता येत नाही… कायम हृदयाच्या एका कोपऱ्यात त्या खास व्यक्तीच्या आठवणी जपूव ठेवाव्या वाटतात… अशीच एक लव्हस्टोरी ‘ऑटोग्राफ’ १४ मे रोजी दुपारी एक वाजता सर्वांच्या भेटीला येणार आहे… महत्त्वाचं म्हणजे ऑटोग्राफ सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात जावून नाही तर, घर बसल्या पाहता येणार आहे. अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री उर्मिला कोठारे, अमृता खानवीलकर, मानसी मोघे स्टारर ‘ऑटोग्राफ’ सिनेमा मोठ्या पडद्यावर नाही तर, छोट्या पडद्यावर म्हणजे थेट टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदा इतकी मोठी स्टारकास्ट असलेला मराठी सिनेमा छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे… सध्या सर्वत्र ‘ऑटोग्राफ’ सिनेमाची चर्चा रंगताना दिसत आहे…
‘ऑटोग्राफ’ सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळी आणि खास स्टोरी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे… सिनेमा पाहून प्रत्येकाच्या जुन्या आठवणी ताज्या होतील… सिनेमा प्रत्येकाच्या आयुष्यातील लव्हस्टोरीवर आधारलेला आहे… त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतर सर्वांना त्यांच्या हृदयातील खास व्यक्तीची आठवण येईल आणि ती लव्हस्टोरी जपून ठेवावी वाटेल अशी आहे… असं सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितलं आहे…
सतीश राजवाडे यांनी आतापर्यंत अनेक प्रेमावर आधारित सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘मुंबई – पुणे – मुंबई’, ‘मुंबई – पुणे – मुंबई २’, ‘मुंबई – पुणे – मुंबई ३’, ‘ती सध्या काय करते’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे… त्यामुळे ‘ऑटोग्राफ’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नक्की काय अनुभवता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे…
‘ऑटोग्राफ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा थेट घरबसल्या पाहण्यासाठी १४ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमा नातेसंबंध, ब्रेकअप आणि जुन्या आठवणींवर आधारलेला असल्याचं दिसून येत आहे… ट्रेलरमध्ये उर्मिला, अंकुश याला म्हणते… ‘प्रेमाच्या मागे धावू नकोस तुझं खरं आपोआप तुला शोधत येईल…’ त्यामुळे अखेर अंकुश कोणासोबत लग्नबंधनात अडकतो… हे ‘ऑटोग्राफ’ सिनेमात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…