Salman Khan Home Firing Case: मुंबई उच्च न्यायालयाने अनुज थापन मृत्यू प्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. आरोपी अनुज थापनचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला नाही… असं न्यायालयाने सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, 14 एप्रिल रोजी अभिनेता सलमन खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अनुज याला अटक केली. पण पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, पोलीस स्थानकातील लॉक-अप शौचालयमध्ये अनुज याने स्वतःला संपवलं. तर पोलीस कोठडीत त्याची हत्या झाली… असा आरोप अनुज याच्या कुटुंबियांनी केला होता… याप्रकरणी मोठी अपडेट समेर आली आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याचा मृत्यू कोठडीतील पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे दिसून येत नाही… असं उच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाचा संदर्भ देताना स्पष्ट केलं. अनुज हा तपासात सहकार्य करू शकला असता आणि माफीचा साक्षीदार होऊ शकला असता ही बाब लक्षात घेता पोलिसांनी त्याला कोणत्याही प्रकारची इजा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही न्यायालयाने नमूद केलं.
अनुज याच्या कोठडी मृत्युच्या चौकशीचा मोहोरबंग अहवाल न्यायदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सादर केला… तो वाचल्यानंतर त्यानुसार, अनुजचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपात काहीच तथ्य असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालावरून प्रतित होत नाही… असे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
त्याचवेळी, अनुजच्या आईने त्याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करणेही समजण्यासारखे असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या निशाण्यावर आहे. अनेकदा भाईजानला जीवेमारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर 12 ऑक्टोबर 2024 रोजी ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी देखील लॉरेन्स बिष्णोई याने स्वीकारली. सलमान खानच्या मदतीला जो कोणी पुढे येईल त्याने स्वतःचा हिशेब करुन ठेवावा… अशी फेसबूक पोस्ट करत लॉरेन्स याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.