बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. सलमान खान अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. सध्या सलमान खान हा बिग बॉस सीजन 18 ला होस्ट करतोय. मात्र, सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरात होता.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र आणि एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या भर रस्त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बिग बॉसचे शूटिंग सोडून सलमान हा थेट बाबा सिद्दीकींसाठी रूग्णालयात पोहोचला होता.
आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे. अनुप जलोटा हे म्हणाले की, सलमान खान याने काळवीट मारले की, नाही हे बाजूला ठेवले पाहिजे आणि त्याने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागितली पाहिजे. कारण आता हा सर्व विषय ईगोवरती आल्याचे दिसत आहे. आता अनुप जलोटा यांच्या विधानाची चर्चा सुरू आहे.
सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, सलमानने कोणत्याही प्राण्याला मारलेच नाही मग माफी का मागायची. जर सलमानने माफी मागितली की, असे होईल की, त्याने आपली चूक ही मान्य केलीये. त्याने काहीही केले नसताना तो माफी कसा मागेल? लॉरेन्स बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतरही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी वाढ ही करण्यात आलीये. मुंबई पोलिसांसोबतच खासगी सुरक्षारक्षक देखील सलमान खानची सुरक्षा करत आहेत. सलमान खान याने जीवाला धोका असताना देखील बिग बॉस सीजन 18 चे शूटिंग केले. विकेंडचा वार सलमान खानने शूट केला.