अनुराग डोभाल याचे बदलले सूर, ‘बिग बॉस 17’च्या निर्मात्यांचे एक पाऊल मागे?

| Updated on: Nov 29, 2023 | 1:25 PM

बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 च्या नुकताच पार पडलेल्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसला. विशेष म्हणजे सलमान खान याच्या निशाण्यावर अनुराग डोभाल हा दिसला. सलमान खान याने अनुरागला खडेबोल सुनावले.

अनुराग डोभाल याचे बदलले सूर, बिग बॉस 17च्या निर्मात्यांचे एक पाऊल मागे?
Follow us on

मुंबई : बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे. मात्र, अजूनही बिग बॉस 17 ला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. गेल्याच आठवड्यात अंकिता आणि विकी यांना समजून सांगण्यासाठी त्या दोघांच्याही आई आल्या होत्या. बिग बॉस 17 मध्ये अनुराग डोभाल उर्फ बाबू भैय्या हे चर्चेत आहे. अनुराग डोभाल हा सतत बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप करताना दिसतोय. फक्त गंभीर आरोपच नाही तर थेट त्याने अनेकदा बिग बॉस 17 च्या विरोधात घरातील सदस्यांना देखील भडकून देण्याचे काम केले.

बिग बॉस 17 मधून आपल्याला बाहेर पडायचे असल्याचे सांगताना अनुराग डोभाल हा दिसला. मात्र, आता अचानकपणे अनुराग डोभाल याचे सूर बदलल्याचे बघायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमोचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चक्क अनुराग डोभाल हा बिग बॉस 17 च्या निर्मात्यांचे काैतुक करताना दिसला आहे.

अनुराग डोभाल हा गार्डन परिसरात बसलेला दिसत आहे. यावेळी विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना अनुराग डोभाल हा म्हणतो की, त्यादिवशी बिग बाॅसने माझ्या म्हणण्यावर दार उघडले नाही हे खूप चांगले झाले. जर त्यांनी दार उघडले असते तर मी खरोखरच बिग बॉस 17 च्या बाहेर गेलो असतो. बऱ्याचवेळा रागात आपण चुकीचे निर्णय घेतो.

बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी त्यादिवशी दार उघडले नसल्याने मला हे कळाले की,  बिग बॉसला माझी काहीच समस्या नाहीये. मला वाटते की, बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी माझी खरोखरच काळजी घेतली आहे. आता अनुराग डोभाल याचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

अनुराग डोभाल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनुराग डोभाल हा बिग बॉस 17 मध्ये दाखल झाल्यापासूनच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अनुराग डोभाल हा बिग बाॅसकडे थेट सलमान खान याची तक्रार करताना दिसला. ज्यानंतर सलमान खान याने विकेंडच्या वारला अनुराग डोभाल याची समाचार घेतला.