मुंबई : बिग बॉस 17 तूफान चर्चेत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. मात्र, नुकताच आता बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. यावेळी चाहत्यांकडून नाही तर बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडलेल्या एका स्पर्धकाने हे आरोप केले आहेत. या स्पर्धकाचे आरोप ऐकून लोक देखील हैराण झाले असून मोठी खळबळ निर्माण झालीये. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर अनुराग डोभाल याने गंभीर आरोप केले. अनुराग डोभाल हा बिग बॉस 17 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसला.
अनुराग डोभाल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बिग बॉस 17 च्या घरातील सदस्यांनी निर्णय घेत अनुराग डोभाल याला बाहेरचा रस्ता दाखवला. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये एक संताप हा बघायला मिळाला. आता नुकताच अनुराग डोभाल याने त्याच्या ब्लाॅगमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.
अनुराग डोभाल याने सांगितले की, कशाप्रकारे बिग बॉस 17 च्या निर्मात्यांकडून त्याला त्रास देण्यात आला. बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तब्बल दोन दिवस त्याला हाॅटेलच्या रूममध्ये ठेवण्यात आले. यावेळी त्याचा छळ करण्यात आला. हेच नाही तर त्याचा संपर्क त्याच्या कुटुंबियांसोबत देखील होऊ दिला नाही. बाहेर नेमके काय सुरू आहे हे देखील त्याला कळू देत नव्हते.
अनुराग डोभाल हा म्हणाला की, मला दोन दिवस हाॅटेलच्या रूमममध्ये डांबून ठेवण्यात आले. यावेळी माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार सतत येत होता. देवाचे आर्शिवाद असल्याने मी ते पाऊल उचलले नाही. माझ्या डोक्यात फक्त हेच सुरू होते की, बाहेर नेमके काय सुरू आहे. मात्र, निर्माते हे मला कोणासोबतच संपर्क होऊ देत नव्हते.
मी शोमधून बाहेर आलो, परंतू मला कोणासोबतच संपर्क करता आला नाही. मी शोमधून बाहेर आल्यानंतरही मला बिग बाॅस 17 च्या निर्मात्यांकडून टॉर्चर करण्यात आले. मुळात म्हणजे मी अशा ठिकाणाहून आलो, तिथे बाहेरच्या जगापासून मी अगोदरच दूर होतो आणि त्यामध्येच मला परत अशाप्रकारे ठेवण्यात आले. आता अनुराग डोभाल याचा हा खुलासा ऐकून अनेकजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.