Aaliyah Kashyap : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याची लेक आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडल्यामुळे आलिया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आलिया सोशल मीडियावर देखील कायम ट्रोल होत असते. एवढंच नाही तर, आलियाला अनेकदा बलात्काराच्या धमक्या देखील आल्या आहेत. पण कोणत्याही धमक्यांना न घाबरता आलियाने प्रत्येक संकटाचा सामना मोठ्या संयमाने केला आहे.
आता पुन्हा आलिया एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. आलिया आता दिग्दर्शक इम्तियाज अली (imtiaz ali) यांच्या मुलीच्या मदतीसाठी पुढे आली आहे. पण इम्तियाज अली यांच्या लेकीला मदत करणं आलियाला महागात पडलं आहे. दरम्यान, आलिया हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत खास मैत्रीण इदा अली हिच्यासाठी फंड जमा करण्यासाठी मागणी केली.
आलियाची मैत्रिण इदा हिच्या आगामी ‘रेड’ सिनेमासाठी पैसे गोळा करण्याचं आवाहन तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं. ज्यामुळे आलियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत म्हणाले, ‘श्रीमंतांकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे, तेही इम्तियाज अली यांच्या मुलीवर…’
नेटकरी पुढे म्हणाला, ‘तुझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी एका फिल्म शाळेला पैसे दिले आहेत, तर तिचे वडील मुलीसाठी एका सिनेमाची निर्मिती नक्कीच करू शकतात.’ नेटकऱ्याच्या या वक्यव्यावर आलियाने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. ज्यामुळे आलिया पुन्हा चर्चेत आली आहे.
आलिया म्हणाली, ‘जर तिच्या वडिलांनी सिनेमाची निर्मिती केली, तुम्हाला नेपोटिझमवर बोलण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. ती स्वतः किही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी देखील तिला थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे…’ असं अनुराग कश्यप याची लेक आलिया कश्यप म्हणाली.
आलिया कश्यप हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आलिया कायम बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत फोटो शेअर करत असते. चित्रपट निर्माता अनुरागची मुलगी आलिया एका वर्षापासून शेनला डेट करत आहे. शिवाय वडील अनुराग कश्यप याच्यासोबत देखील आलिया कायम फोटो शेअर करत असते.
आलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आलिया अभिनेत्री नसली तरी तिच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.