Aaliyah Kashyap | अनुराग कश्यप याच्या लेकीने लिपलॉकचा फोटो शेअर करत केली मोठी घोषणा, आलिया हिने लिहिले की…

| Updated on: May 20, 2023 | 8:53 PM

अनुराग कश्यप हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. अनुराग कश्यप हे नेहमीच वादात देखील अडकतात. अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यामधील वाद हा सर्वांनाच माहितीये. अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री हे नेहमीच एकमेकांच्या विरोधात पोस्ट शेअर करताना दिसतात.

Aaliyah Kashyap | अनुराग कश्यप याच्या लेकीने लिपलॉकचा फोटो शेअर करत केली मोठी घोषणा, आलिया हिने लिहिले की...
Follow us on

मुंबई : चित्रपट निर्देशक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हे नेहमीच चर्चेत असतात. अनुराग कश्यप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी अनुराग कश्यप हे थिएटरमध्ये पोहचले होते. अनुराग कश्यप आणि शाहरूख खान (Shah Rukh Khan) हे काॅलेजपासूनचे खास मित्र आहेत. इतकेच नाही तर सोशल मीडियावर काही गोष्टींमुळे अनुराग कश्यप हे वादात अडकले, त्यावेळी शाहरूख खान यानेच अनुराग कश्यपला फोन (Phone) करून थेट या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. अनुराग कश्यप हे बऱ्याच वेळा वादात अडल्याचे देखील दिसते.

अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप ही देखील कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहेत की, आलिया कश्यप ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, अजूनही आलिया ही नेमकी कोणत्या चित्रपटातून पदार्पण करणार हे कळू शकले नाहीये. आलिया कश्यप हिच्या चित्रपटाची चाहते वाट पाहताना दिसत आहेत.

आलिया कश्यप हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले नाहीये. मात्र, सोशल मीडियावर आलिया कश्यप हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आलिया कश्यप ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आलिया कश्यप ही दिसते. आलिया कश्यप ही जोरदार चर्चेत सध्या आहे.

आलिया कश्यप हिचा नुकताच साखरपुडा हा पार पडलाय. आपल्या साखरपुड्याची माहिती आणि काही खास फोटो शेअर करत आलिया कश्यप हिने पोस्ट शेअर केली आहे. आलिया कश्यप हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरे याच्यासोबत तिने साखरपुडा केला आहे. ही पोस्ट तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

आलिया कश्यप हिने एका फोटोमध्ये चक्क लिपलॉक केल्याचे देखील दिसत आहे. फोटो शेअर करत आलिया कश्यप कॅप्शनमध्ये लिहिले की, तर हे झाले…माझा सर्वात चांगला मित्र, माझा जोडीदार, माझा सोलमेट आणि आता माझा मंगेतर. तू माझ्या जीवनाची इच्छा आहेस. खरे आणि बिनशर्त प्रेम कसे असते हे दाखवल्याबद्दल धन्यवाद. आता आलिया हिची पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.