Anushka Sharma’s Bother Love Life : झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी फक्त आणि फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या लव्हलाईफबद्दल चर्चा रंगत आहे. हा प्रसिद्ध सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आहे. कर्णेश ‘बुलबुल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीला डेट करत असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत होती. पण आता तृप्तीने सर्व चर्चांना पूर्णविराम देत, प्रेमाची कबुली दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्णेश आणि तृप्ती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण आता खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्णेशसोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला आहे. तृप्तीने कर्णेशसोबत एक रोमांटिक फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये कर्णेश तृप्तीला किस करताना दिसत आहे. तृप्तीने कर्णेशसोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये बदामाच्या आकाराचा इमोजी आणि ‘माय…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही, तर तृप्तीच्या पोस्टवर अनेक चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे तृप्ती आणि कर्णेशचा फोटो कर्णेशच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सौरभ मल्होत्राने शेअर केला आहे. तर अभिनेत्रीने सौरभची पोस्ट रिशेअर केली आहे. सध्या अनुष्का शर्माच्या भावाची लव्हलाईफ चर्चेत आहे.
तृप्तीबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री ‘कला’ सिनेमातून प्रसिद्धीझोतात आली. सिनेमातील तिच्या भूमिकेचं आणि अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. ‘कला’ सिनेमापूर्वी अभिनेत्री ‘बुलबुल’ सिनेमात देखील झळकली होती.
‘बुलबुल’ सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकली. सिनेमाची निर्मिती अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ करनेश शर्मा यांनी मिळून केली. सिनेमामध्ये तृप्तीसोबत अभिनेता अविनाश तिवारी आणि राहुल बोसने मुख्य भूमिका साकारली होती.