ऐश्वर्या रायच्या ‘कजरा रे’ गाण्यावर अनुष्का शर्माने धरला ठेका, अभिनेत्रीत्या अदा घायाळ करणाऱ्या

| Updated on: Jun 08, 2024 | 2:42 PM

Kajra Re Song : 'कजरा रे' गाण्यावर अनुष्का शर्माच्या दिलखेच अदा, ऐश्वर्या रायच्या गाण्यावर अनुष्काने धरला ठेका, व्हिडीओ पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का शर्मा हिच्या व्हिडीओची चर्चा... पाहा व्हिडीओ...

ऐश्वर्या रायच्या कजरा रे गाण्यावर अनुष्का शर्माने धरला ठेका, अभिनेत्रीत्या अदा घायाळ करणाऱ्या
Follow us on

अभिनेत्री ऐश्वर्या राय आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. विशेषतः स्वतःच्या कामामुळे… ऐश्वर्या राय हिचं ‘कजरा रे’ गाणं कोणीच विसरलंच नसेल. ‘बंटी और बबली’ सिनेमातील ‘कजरा रे’ गाणं तुफान गाजलं. गाण्यात ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना दमदार डान्स केला होता. अनेक सेलिब्रिटींनी हे गाणे रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. आता अनुष्का शर्माचं व्हर्जन समोर आले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एक अवॉर्ड शोमध्ये अनुष्का शर्मा हिने ‘कजरा रे’ गाण्यावर ठेका धरला होता. अभिनेत्रीची स्टाईल, मेकअप, ड्रेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय अनुष्का शर्मा हिने केलेला डान्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडला. सांगायचं झालं तर, ‘बंटी और बबली’ सिनेमा प्रदर्शित होऊल 19 वर्ष झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन यांनी या गाण्याशी निगडीत त्यांच्या आठवणी सांगितल्या होत्या. अभिषेक आणि ऐश्वर्याला स्टेजवर परफॉर्म करताना पाहणे हा मेगास्टारसाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता. आजही गाण्याचे शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2005 मध्ये अभिषेक-ऐश्वर्या यांनी अमिताभ यांच्यासोबत आयफा पुरस्कार सोहळ्यात दमदार डान्स केले होता. सांगायचं झालं तर, ‘बंटी और बबली’ सिनेमाक अभिषेक याच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होता. सिनेमात अमिताभ बच्चन यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘कजरा रे’ गाण्यासोबत सिनेमातील इतर गाणी देखील हीट झाली.

सिनेमातील ‘कजरा रे’ या गाण्याने अनेक पुरस्कार देखील स्वतःच्या नावावर केले आहेत. ‘बंटी और बबली’ रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न झालं. 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला.

अनुष्का हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. ‘झिरो’ सिनेमानंतर अभिनेत्री कोणत्याच सिनेमात दिसली नाही. अनुष्का हिने काही महिन्यांपूर्वी मुलहा अकाय याला जन्म दिला.