मुंबई : झगमगत्या विश्वाताली अनेक गोष्टी चाहत्यांना आकर्षित करत असतात. सेलिब्रिटींकडे असणारा पैसा, प्रसिद्धी, त्यांचं रॉयल आयुष्य चाहत्यांना प्रचंड आवडतं. बॉलिवूडमधील अनेक गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू आहेत, त्याचं प्रमाणे बॉलिवूडला देखील दोन बाजू आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरणं, त्यांच्या खास मित्रींबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण सेलिब्रिटींचे अनेकांसोबत वाद देखील असतात. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत चांगले संबंध आहेत. पण काही सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचा छत्तीसचा आकडा आहे. तर आज जाणून घेवू कोणत्या सेलिब्रिटींसोबत अनुष्का शर्मा हिचं वैर आहे.
अभिनेत्री करीना कपूर | करीना कपूर आणि अनुष्का शर्मा दोघी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण दोघी एकमेकांचं तोडं देखील पाहत नाहीत. दोघी एकमेकींना कॉम्पिटीटर समजतात. कधी करीना आणि अनु्ष्का एकत्र देखील दिसत नाहीत.
अभिनेत्री तमन्ना भाटिया | तमन्ना भाटिया देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तमन्नाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण जेव्हा तमन्ना आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. त्यानंतर तमन्ना आणि अनुष्का यांच्यातील नात्याला ठेच पोहोचली.
अभिनेत्री कंगना रनौत | अभिनेत्री कंगना रनौत आणि अनुष्का शर्मा यांच्यातील नात देखील खास नाही. दोघी एकमेकींसोबत बोलत नसल्याची चर्चा आहे. घराणेशाहीच्या वक्तव्यावर अनुष्काने कंगना चुकीचं ठरवलं होतं.
अभिनेत्री दीपिका पादुकोण | दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा दोघी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण दोघी एकमेकांचं तोडं देखील पाहत नाहीत. दिग्दर्शिक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोनंतर दोघींमध्ये काही गोष्टी बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
अभिनेत्री सोनम कपूर | सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा दोघी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण दोघी एकमेकांचं तोडं देखील पाहत नाहीत. ‘रब ने बना दी जोडी’ सिनेमात सोनम हिला बाहेरचा रस्ता दाखवून अनुष्काला कास्ट करण्यात आलं होतं. म्हणून दोघी एकमेकींसोबत बोलत नाहीत.