मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आज 35 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. आज देशभरातील त्यांचे चाहते क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विराट कोहली फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. विराट कोहली याच्या लूकवर देखील असंख्या महिला चाहत्या फिदा आहेत. स्वतःची आवड जोपासत विराट कोहली आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विराट भारतासाठी खेळत आहे. भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली रॉयल आयुष्य जगते. विराट त्याच्या कुटुंबासोबत मुंबई याठिकाणी आलिशान घरात राहतो.
सध्या सर्वत्र अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा पती आणि लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. विराट कोहली अनेक मार्गांनी कोट्यवधी रुपयांची माया कमावतो. विराट कोहली याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्याच्याकडे तब्बल 1050 कोटी रुपयांची संपत्ती आहे .
विराट कोहली याने 2008 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर 2017 मध्ये त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्यानंतरही तो टीम इंडियासाठी सातत्याने विक्रम रचत आहे.
बीसीसीआयने विराट कोहली याला कॉन्ट्रॅक्ट यादीत ‘ए प्लस’ श्रेणीत ठेवलं आहे. क्रिकेटपटूला करारानुसार बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय BCCI त्याला एक कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये, एक वनडे खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि एक T20 सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपये देत असल्याची माहिची समोर येत आहे.
विराट कोहली याच्याबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटपटू 8 पेक्षा जास्त ब्रँडसाठी जाहिरातींसाठी काम करतो. विराट प्रत्येक जाहिरातीच्या शूटिंगसाठी वर्षाला 7.50 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो. एवढंच नाही तर, विराट कोहली याचं मुंबईत आलिशान घर देखील आहे. मुंबई येथील वरळी याठिकाणी विराट याचं भव्य घर आहे. 2016 मध्ये विराट याने हे घर जवळपास 34 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
विराट कोहली याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विराट याने अनेक महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. विराट याच्याकडे Audi R8 V10 Plus, Audi R8 LMX, Audi A8 L, Audi Q8, Audi S5 सारख्या कारचा समावेश आहे.