7 जणांसोबत अफेअर,अजूनही सापडलं नाही खरं प्रेम; अब्जाधीश असलेली प्रसिद्ध अभिनेत्री 43 व्या वर्षीही सिंगलच

| Updated on: Dec 24, 2024 | 1:58 PM

प्रसिद्ध अभिनेत्री 43 व्या वर्षीही एवढी प्रसिद्धी मिळूनही सिंगलच आहे. चित्रपटांपेक्षाही तिच्या खाजगी आयुष्याची चर्चा सर्वात जास्त होताना दिसते. अभिनेते, क्रिकेटपटू आणि उद्योगपतींसोबत तिचे नाव जोडले गेले आहे, पण ती अद्यापही अविवाहितच आहे. कोण आहे ही अभिनेत्री

7 जणांसोबत अफेअर,अजूनही सापडलं नाही खरं प्रेम; अब्जाधीश असलेली प्रसिद्ध अभिनेत्री 43 व्या वर्षीही सिंगलच
Follow us on

मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे अफेअर आणि ब्रेकअप या गोष्टी काही नवीन नाहीत. प्रत्येकाच्या खाजगी आयुष्याबद्दल काहीना काही चर्चा या होतच असतात. बॉलिवूडमध्ये अशा चर्चा नेहमीच होताना दिसतात. अशाच एक चर्चा आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल.

प्रसिद्ध असलेली अभिनेत्री खऱ्या प्रेमाच्या शोधात

बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तिच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे असंच काहीसं दिसून येत आहे. या अभिनेत्रीचे जवळपास सर्वच चित्रपट हे प्रचंड गाजले आहेत. पडद्यावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमाच्या बाबतीत तिच्या हाती निराशाच आली.

मनोरंजन क्षेत्रातील तिच्या नात्यांमुळे प्रचंड चर्चेत असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी. अनुष्काचे साऊथमध्ये मोठं नाव आहे. एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिचं नाव आहे. पण अनुष्का चित्रपट आणि अभिनयापेक्षाही जास्त खाजगी आयुष्याची चर्चा झाली आहे. बाहुली चित्रपट अनुष्काच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

43 वर्षीही सिंगलच

अनु्ष्का आज 43 वर्षांची आहे पण अजूनही ती सिंगलच आहे. तिने अजूनही लग्न केलेलं नाही. अनुष्काचे नाव हे जास्त चर्चेत होतं ते अभिनेता सुपरस्टार प्रभास याच्यासोबत. ते बऱ्याचदा एकत्रही दिसले. अनुष्का शेट्टी आणि प्रभास रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती.

दोघे लग्न देखील करणार असल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. पण नंतर मात्र त्यांचं एकत्र दिसंणं आणि चित्रपटात काम करणेही दिसण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या चर्चाही कमी होत गेल्या.

अनुष्काचे नाव  7 जणांसोबत जोडले गेलं

अनुष्काचे नाव हे 7 जणांसोबत जोडले गेलं असल्याचं म्हटलं जातं. ज्यामध्ये क्रिकेटपटू, उद्योगपती आणि अभिनेत्यांचा समावेश आहे. मात्र या अफेअरच्या चर्चांनंचर पुढे तिच्या आयुष्यात एकही नात लग्नापर्यंत गेलं नाही. सध्या अनुष्का 43 वर्षांची आहे पण ती अद्यापही सिंगलच आहे. ती तिच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे असंच दिसून येत आहे.

अनुष्का शेट्टीने 2005 मध्ये करिअरला सुरुवात केली होती. तिने बरेच चित्रपट केले मात्र तिला ‘बाहुबली’ चित्रपटातून बरीच प्रसिद्धी मिळाली. अनुष्का शेट्टीने एकादा सांगितले होते की राहुल द्रविड तिचा क्रश होता.