‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते संतोष हणमंत नलावडे यांच रस्ते अपघातातस निधन झालं आहे. संतोष यांनी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथे रस्ते अपघातात संतोष यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले असताना त्यांचा अपघात झाला. अपघातात संतोष गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान अभिनेत्याचं निधन झालं. सोमवारी संतोष यांनी अखेरचा श्वास घेतला. संतोष यांच्या निधनानंतर मित्रपरिवार आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात कार्यरत होते.
संतोष नलावडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं होतं. नोकरी सांभाळत त्यांनी स्वतःची अभिनयाची आवड देखील जोपासली. संतोष यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेशिवाय संतोष यांनी ‘शेतकरी नवरा हवा’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘मन झालं बाजींद’, ‘कॉन्स्टेबल मंजू’, ‘लागीर झालं जी’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. आता संतोष नलावडे यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.