हिंदू असलेल्या ए आर रेहमान यांनी का स्वीकारला इस्लाम धर्म? घटस्फोटामुळे खासगी आयुष्य चर्चेत

| Updated on: Nov 20, 2024 | 1:19 PM

AR Rahman And Saira Banu Divorce: दिलीप कुमार असं होतं ए आर रेहमान यांचं नाव, संगीतकारने हिंदू धर्म सोडून का स्वीकारला इस्लाम धर्म? मोठं आहे कारण...

हिंदू असलेल्या ए आर रेहमान यांनी का स्वीकारला इस्लाम धर्म? घटस्फोटामुळे खासगी आयुष्य चर्चेत
Follow us on

AR Rahman And Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान घटस्फोटामुळे खासगी आयुष्य चर्चेत… वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. घटस्फोटामुळे चर्चेत आल्यामुळे ए आर रेहमान याच्या आयुष्यातील अनेक पैलू देखील समोर येत आहे.

ए आर रेहमान यांनी का बदललं स्वतःचं नाव?

ए आर रेहमान यांचं नाव दिलीप कुमार असं होतं. पण त्यानंतर स्वतःचं नाव बदललं आणि ए आर रेहमान म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचं नाव दिलीप कुमार असं होतं. पण त्यांना स्वतःच्या नावाचा तिरस्कार होता, म्हणून रेहमान यांनी नंतर स्वतःचं नाव बदललं कारण हे नाव त्यांना स्वतःच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देतं…

बहिणीची प्रकृती होती गंभीर

वयाच्या 25 व्या वर्षी रेहमान यांनी स्वतःला अपयशी मानलं आणि दररोज आत्महत्येचा विचार केला. हे वर्ष 1989 होते जेव्हा रेहमानची लहान बहीण गंभीर आजारी पडली. तिच्यावर उपचार केले पण सर्व डॉक्टरांनीही तिच्या जगण्याची आशा नसल्याचं सांगितलं.

हे सुद्धा वाचा

ए आर रेहमान यांनी स्वीकारला इस्लाम धर्म…

बहिणीच्या दिर्घायुष्यासाठी रेहमान यांनी मंदिरे आणि मशिदींमध्ये प्रार्थना केली. रेहमान यांची प्रार्थना पूर्ण झाली आणि त्यांची बहीण चमत्कारिकरित्या स्थिर झाली. हा चमत्कार पाहून रेहमान यांनी इस्लाम स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख ए आर रेहमान अशी निर्माण केली. पण आता रेहमान घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत.

ए आर रेहमान यांचं लग्न

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 29 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं. 1995 मध्ये ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न झालं. दोघांनी घरच्यांच्या सहमतीने अरेंज मॅरेज केलं होतं. पण आयुष्यात कठीण वळण आलं आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.