अरबाज खान याने दुसऱ्या लग्नात असं काय केलं, ज्यासाठी वडिलांचा होता नकार? व्हिडीओ पाहून म्हणाल…

| Updated on: Dec 29, 2023 | 11:07 AM

Arbaaz Khan : सलीम खान यांचा नकार असताना देखील दुसऱ्या लग्नात अरबाज खान याने केलं तरी काय? 'त्या' व्हिडीओवर रवीना टंडन हिची लेक देखील म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खुद्द अरबाज याने पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडीओची चर्चा...

अरबाज खान याने दुसऱ्या लग्नात असं काय केलं, ज्यासाठी वडिलांचा होता नकार? व्हिडीओ पाहून म्हणाल...
Follow us on

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : अभिनेता अरबाज खान याने नुकताच 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अरबाज याने देखील काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या अरबाज याने पोस्ट केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अरबाज त्याची दुसरी पत्नी शुरा खान हिच्यासाठी गाणं म्हणताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अरबाज खान अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातील ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ गाणं म्हणताना दिसत आहे.

सांगायचं झालं तर, अरबाज याने हा व्हिडीओ 28 डिसेंबर रोजी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करत अरबाज म्हणाला, ‘वडील सांगायचे तू गायक नाही तर, क्रिकेटपटू हो… यामध्ये काही हरकत नव्हती…’ अरबाज याच्या व्हिडीओवर अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी म्हणाली, ‘मी हे कसं काय मिस केलं…’

हे सुद्धा वाचा

 

 

अरबाज आणि शुरा यांच्या लग्नाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गायिका हर्षदीप कौर गाताना दिसत आहे. एका फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान, अरहान खान, अलविरा खान अग्निहोत्री आणि शुरा खान हे तिघे एकत्र डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

 

अरबाज आणि शुरा यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 24 डिसेंबर रोजी अरबाज आणि शुरा यांनी कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. अरबाज आणि शुरा यांच्या लग्नानंतर अनेक चर्चा रंगल्या… दोघांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील उपस्थित होते.

अरबाज याच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान देखील उपस्थित होता. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान याने सावत्र आईसोबत डान्स देखील केला. सोशल मीडियावर अरहान याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. अरहान हा अरबाज आणि मलायका यांचा मुलगा आहे.