अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाले आहेत. घटस्फोटानंतर अरबाज यांने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण आता घटस्फोटानंतर पहिल्यांदा खान कुटुंबाला मलायका आणि तिच्या आईसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या खान – अरोरा कुटुंबियांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खान कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
अरबाज खान याने दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्यांना मलायका आणि शुरा आमने – सामने आल्या आहेत. तर व्हिडीओमध्ये अरबाज आणि शुरा यांना सर्वांचं लक्ष वेधलं. एकमेकांचा हात पकडून चालताना दोघांना स्पॉट करण्यात आलं. तर एका व्हिडीओमध्ये सलीम खान आणि मलायकाची आई एकाच कारमध्ये दिसले.
व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांना दोन्ही कुटुंबियांमधील नातं आवडलं आहे, तर अनेकांनी मात्र त्यांना ट्रोल केलं आहे. सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज यांना मुलगा अरहान खान याच्यासाठी एकत्र येताना स्पॉट करण्यात आलं.
अनेकदा मलायका आणि अरबाज यांना मुलगा अरहान खान याच्यासोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. एवढंच नाहीतर, वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान देखील उपस्थित होता. तेव्हा अरहान याने वडील आणि सावत्र आईसोबत अनेक फोटो देखील क्लिक केले. पण लग्नात मलायका आली नव्हती…
मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 2019 मध्ये अर्जुन- मलायका यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. तेव्हा मलायका – अर्जुन यांना ट्रोल देखील करण्यात आलं. पण दोघांनी सर्व गोष्टींवर दुर्लक्ष करत फक्त त्यांच्या भावनांना आणि एकमेकांवर असलेल्या प्रेमाला महत्त्व दिलं.
सोशल मीडियावर देखील मलायरा – अर्जुन यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय दोघे त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. अनेकांना दोघांची जोडी आवडते, तर अनेक नेटकरी दोघांना ट्रोल करतात. शिवाय मलायका – अर्जुन लग्न कधी करणार असा प्रश्न देखील दोघांना अनेकदा विचारण्यात येतो…