मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायकाच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत थेट आत्महत्या केली. वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोरा तुटलेली दिसली. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट घेतला. अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका हिने अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे कायमच सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मात्र, काही दिवसांपासून सतत यांच्या ब्रेकअपच्या सुरू असल्याचे बघायला मिळतंय.
मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्यासोबत अर्जुन कपूर दिसला. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा एक लेक असून त्याचे नाव अरहान खान आहे. कायमच आई वडिलांसोबत स्पॉट होताना अरहान हा दिसला. सध्या अरहान खान हा विदेशात शिक्षण घेतोय. मात्र, तो अनेकदा मुंबईमध्ये स्पॉट होतो.
अरहान खान याला विदेशात जाताना सोडण्यासाठी मलायका आणि अरबाज खान हे कायमच दिसतात. आता मुलाच्या बॉलिवूड करिअरबद्दल मोठा खुलासा करताना अरबाज खान हा दिसलाय. अरबाज खान हा म्हणाला की, आता सध्या अरहान हा तरूण आहे आणि तो त्याच्या पर्सनल ग्रोथवर लक्ष देतोय.
अरहानला ज्यावेळी वाटले की, त्याला अभिनेता बनायचे आहे त्यावेळी त्यासाठी एक दोन वर्ष तो देईल. मला हा नक्कीच विश्वास आहे की, तो एक चांगला अभिनेता होईल. पहिल्यांदाच लेकाच्या बॉलिवूड करिअरवर बोलताना अरबाज खान हा दिसलाय. हेच नाही तर अरबाज खान याने स्पष्ट सांगितले की, अरहान हा बॉलिवूडमध्ये पर्दापण करू शकतो.
आता लोकांना प्रश्न पडला की, सलमान खान हाच अरहान खान याला लॉन्च करणार का? सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक लोकांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेत अत्यंत मोठी वाढ देखील करण्यात आलीये.