मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट 2017 मध्ये झाल्यानंतर अरबाज खान याने डिसेंबर 2023 मध्ये दुसरे लग्न शूरा खान हिच्यासोबत केले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शूरा खान आणि अरबाज खान यांनी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये निकाह केला. हेच नाही तर अरबाज खान आणि शूरा यांच्या लग्नाला मुलगा अरहान खान हा देखील उपस्थित होता. चित्रपटाच्या सेटवर अरबाज खान आणि शूरा यांची पहिली भेट झाली. पहिल्यांदा मित्र आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात शूरा खान आणि अरबाज खान पडले. 2017 मध्ये मलायकासोबत अरबाजने घटस्फोट घेतला.
आता नुकताच अरबाज खान याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अरबाज खान हा काही मोठे खुलासे करताना दिसला. अरबाज खान म्हणाला की, लग्नानंतर मी बदललो आहे. हेच नाही तर माझ्या काही गोष्टींमध्येही मोठा बदल झालाय. शूरा माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी नक्कीच झाल्या आहेत.
अरबाज पुढे म्हणाला की, मी जेंव्हा पत्नी शूरा हिला ओळखण्यास सुरूवात केली तेंव्हा मी खुश आहे. सेटल, शांत देखील मी झालोय. हेच नाही तर मी शूराला डेट करण्यास सुरूवात केली, तेंव्हापासूनच माझ्या आयुष्यात बदल होण्यास सुरूवात झाली. तेंव्हापासून माझ्या आयुष्यात सर्वकाही चांगलेच होताना दिसत आहे. माझा आत्मविश्वास देखील खूप वाढलाय.
पुढे अरबाज म्हणाला की, मी शूराला पटना शुक्लाच्या सेटवर पहिल्यांदा भेटलो, ती रवीनाच्या टीममध्ये होती. सुरूवातीला आमचे फार काही बोलणे होत नव्हते. मात्र, हळूहळू आमच्यामधील संवाद वाढण्यास सुरूवात झाली. त्यानंतर आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवण्यास सुरूवात केली. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडत होते.
यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मला माझ्या आयुष्यात सेटल व्हायचे होते. त्यानंतर मी विचार केला की, जर काही झाले नाही तर आम्ही चांगले मित्र म्हणून आयुष्यात राहू. आम्ही अजिबात वेळ वाया न घालता निकाह केला. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्येच आम्ही लग्न केले. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.