मुलगा अरहानबद्दल बोलताना अरबाज खानचे मोठे विधान, म्हणाला, लग्नानंतर..

| Updated on: Feb 16, 2024 | 2:37 PM

अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अरबाज खान याने शुरा खान हिच्यासोबत निकाह केलाय. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. वडिलांच्या लग्नात धमाल करताना अरहान खान हा दिसला. आता नुकताच अरबाज खानने मोठा खुलासा केलाय.

मुलगा अरहानबद्दल बोलताना अरबाज खानचे मोठे विधान, म्हणाला, लग्नानंतर..
Follow us on

मुंबई : अरबाज खान हा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. 2017 मध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला. अरबाज खान आणि मलायका यांच्या घटस्फोटानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. हेच नाही तर बऱ्याच वेळा एकत्र स्पाॅट होताना मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दिसतात. मलायका आणि अरबाज खान यांचा एक मुलगा असून त्याचे नाव अरहान खान आहे. आता काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शुरा खान हिच्यासोबत निकाह केला. हा निकाह अत्यंत खास पद्धतीने पार पडला. अरबाज आणि शुरा यांच्या जवळचे लोक या निकाहला उपस्थित होते.

विशेष म्हणजे वडील अरबाज खान यांच्या लग्नामध्ये धमाका करताना अरहान खान हा दिसला. या निकाहाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. नुकताच आता अरबाज खान याने मोठे विधान केले. अरबाज खान हा मुलगा अरहान खान याच्याबद्दल बोलताना दिसला. आता अरबाज खान याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

अराबाज खान म्हणाला की, पापाराझी हे अरहान याला पसंत करतात. हेच नाही तर अरहान हा देखील त्यांना पोझ देतो. या प्रकरणात मी खूप जास्त लाजाळू होतो. मी आता कुठे लग्नानंतर थोडा कंफर्टेबल झालोय. प्रेस समोर उभे राहणे आणि स्माईल देणे या गोष्टी करण्यासाठी मला अनेक वर्षे लागली. मात्र, अरहान हा आता 21 व्या वर्षात हे सर्व करतोय.

पुढे अरबाज खान म्हणाला की, या गोष्टी तुम्ही जितके लवकर शिकाल तेवढे नक्कीच चांगले आहे. लेकाच्या बाॅलिवूड डेब्यूबद्दल बोलताना अरबाज खान म्हणाला की, आता त्याला थोडा वेळ आहे. सध्या अरहान खान काही गोष्टींवर स्वत: काम करत आहे. त्याला अजून वेळ लागणार हे नक्की आहे. पहिल्यांदाच लेकाच्या डेब्यूबद्दल जाहिरपणे बोलताना अरबाज खान दिसला.

अरहान खान हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतो. काही दिवसांपूर्वीच आई मलायका अरोरा आणि ओरी यांच्यासोबत विदेशात पार्टी करताना अरहान खान हा दिसला. अरहान खान आणि त्याच्या पर्सनल लाईफमुळेही जोरदार चर्चेत असतो. अरहान खान हा थेट पलक तिवारी हिला डेट करत असल्याची मध्यंतरी जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. अनेकदा हे स्पाॅट होताना देखील दिसले.