मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याचा लहान भाऊ आणि अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. अरबाज खान याने मेकअप आर्टीस्ट शूरा खान हिच्यासोबत दुसरा संसार थाटला आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज आणि शूरा यांचा मोठ्या थाटात निकाह संपन्न झाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज खान आणि शूरा खान यांच्या निकाहची चर्चा रंगली आहे. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या निकाहचा पहिला फोटो देखील समोर आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता. एवढंच नाही तर, सावत्र आईसोबत अरहान याने खास पोज देखील दिली आहे. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या निकाहचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खुद्द अरबाज खान याने देखील दुसऱ्या पत्नीसोबत निकाहनंतर काही फोटो पोस्ट केले आहे. दुसऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, मी आणि माझं प्रेम नव्या आयुष्याला या दिवसापासून सुरुवात करत आहोत…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे!’ अरबाज याच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेटंचा वर्षाव करत आहेत. अरबाज खान याच्या नव्या आयुष्यासाठी फक्त चाहत्यांनी नाही तर, सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्या घरी अरबाज आणि शूरा यांचा निकाह पार पडला. निकाहसाठी अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर शूरा खान आणि अरबाज खान यांच्या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, शूरा खानपूर्वी अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर देखील दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत ब्रेकअपनंतर जॉर्जिया हिने भावना देखील व्यक्त केल्या होत्या.
अरबाज खान आणि मलायका अरोरा
अरबाज खान याचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा दोखील आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज आणि मलायका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. तर अरबाज याने शूरा हिच्यासोबत दुसरा संसार थाटला आहे.