2017 मध्ये मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान याचे नाव अनेक मुली आणि अभिनेत्रींसोबत जोडले गेले. विदेशी अभिनेत्रींना डेट करताना देखील अरबाज खान हा दिसला. मागच्या वर्षी 24 डिसेंबर 2023 रोजी अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित राहिले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून अभिनेत्री मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. विशेष म्हणजे अरबाज खान आणि शूरा खानच्या लग्नात अरहान खान हा देखील धमाल करताना दिसला.
अरबाज खान हा नेहमीच पत्नी शूरा खान हिच्यासोबत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. हेच नाही तर हे दोघे कायमच एकसोबत स्पाॅट होताना देखील दिसतात. अरबाज खान आणि शूरा खान यांना लग्नानंतर सतत ट्रोल केले जाते. अरबाज आणि शूरा यांच्या वयामध्ये खूप मोठे अंतर आहे, यावरूनही अनेकदा बोलले जाते.
नुकताच शूरा खान हिचे एक सेक्शन सोशल मीडियावर झाले. यावेळी एका व्यक्तीने तिच्यामध्ये आणि अरबाज खानमध्ये असलेल्या वयाबद्दल आणि उंचीच्या फरकावर प्रश्न विचारला. यावर सडेतोड उत्तर देताना शूरा खान ही दिसलीये. आता शूरा खान हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. पहिल्यांदाच यावर बोलताना देखील शूरा दिसलीये.
शूरा म्हणाली की, अरबाजची उंची 5.10 फूट आहे आणि माझी उंची 5.1 आहे. हेच नाही तर पुढे शूरा म्हणाली, वय फक्त आकडा आहे. पहिल्यांदाच वयाच्या आणि उंचीच्या होणाऱ्या टिकेवर बोलताना शूरा खान ही दिसली. अरबाज खान याचे वय 56 आहे तर शुरा खान हिचे वय 35 आहे. यामुळे या दोघांवर कायमच टीका ही केली जाते.
शूरा खान आणि अरबाज खान यांच्या वयामध्ये तब्बल 21 वर्षांचे अंतर आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा एक मुलगा देखील आहे. अरबाज खान हा सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याच्या घरी जाताना मलायका अरोरा दिसली.