अर्चना पूरन सिंगच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य काय? दिवाळीत स्वतःला संपवलं आणि…

| Updated on: Jan 14, 2025 | 9:43 AM

दिवाळीत अर्चना पूरन सिंगच्या पहिल्या नवऱ्याने का संपवलं स्वतःचं आयुष्य? पहिल्या नवऱ्याने साथ सोडल्यानंतर अभिनेत्रीने..., अर्चनाच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला नाही माहिती...

अर्चना पूरन सिंगच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य काय? दिवाळीत स्वतःला संपवलं आणि...
Follow us on

अभिनेत्री अर्चना पूरन सिंग हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अर्चना अनेक सिनेमे आणि शोच्या माध्यमातून चाहत्याच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमुळे अर्चना कायम गेस्ट म्हणून दिसते. एवढंच नाही तर, अर्चना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नसेल.

अर्चना आत दुसरा नवरा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण फार कमी चाहत्यांना अभिनेत्रीच्या पहिल्या नवऱ्याबद्दल माहिती आहे. अर्चना पूरन सिंग हिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव गुरिंदर सिंग असं होतं. मॉडेलींगच्या विश्वात गुरिंदर याची ओळख सनी रेयार अशी होती.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गुरिंदर आणि अर्चना यांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 1991 मध्ये अर्चनाच्या पहिल्या नवऱ्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. पहिल्याा नवऱ्याच्या मृत्यूनंतर अर्चनाच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाची एन्ट्री झाली.

अर्चना पूरन सिंगचं दुसरं लग्न

पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर अर्चना हिने दुसरं लग्न केलं. 30 जून 1992 मध्ये अर्चना हिने अभिनेता परमीत सेठी याच्यासोबत लग्न केलं. अर्चना आणि परमीत यांना दोन मुलं देखील आहेत. आर्यमान आणि आयुष्मान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अर्चना आणि परमीत यांच्या नात्याबद्दल झालं तर, दोघांनी पहिली ओळख एक कार्यक्रमात झाली होती. कालांतराने पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. एकमेकांना प्रपोज केल्यानंतर दोघांना लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्मय घेतला.

परमीत आणि अर्चना यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांमध्ये 7 वर्षांचं अंतर आहे. अर्चना आता 62 वर्षांची आहे, तर परमीत 55 वर्षांचा आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अर्चना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून अर्चना झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील अर्चना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.