कोलकाता बलात्कार – हत्या प्रकरणावर अरिजीत सिंगने मागितला न्याय, गाण्यातून वेदना व्यक्त

| Updated on: Aug 29, 2024 | 8:38 AM

Kolkata Doctor Case: कोलकाता बलात्कार - हत्या प्रकरणावर अरिजीत सिंगकडून न्याय मिळण्याची मागणी, गाण्यातून वेदना केल्या व्यक्त, पण गायकावर का होतेय टीका?, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरिजीत सिंग यांच्या गाण्याची चर्चा...

कोलकाता बलात्कार - हत्या प्रकरणावर अरिजीत सिंगने मागितला न्याय, गाण्यातून वेदना व्यक्त
Follow us on

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. तर बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैगिंक अत्याचार केले. सतत घडणाऱ्या धक्कादायक घटनांवर सामान्य जनतेसह सेलिब्रिटी देखील न्यायाची मागणी करत आहे. आता बॉलिवूडचा प्रसि द्ध आणि लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने देखील कोलकाता येथे झालेल्या बलात्कार, हत्या प्रकरणी न्याय मिळण्याची मागणी केली आहे. अरिजीत सिंग यांने गाण्यातून मनातील दुःख व्यक्त केलं आहे.

सध्या अरिजीत सिंग याचं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी गायकाचं कौतुक केलं आहे, तर अनेकांनी अरिजीत सिंग यावर टीका देखील केली आहे. अरिजीत सिंग याने गाणं युट्यूबवर प्रदर्शित केलं आहे. गाण्याचं लेखण, कंपोझ आणि गायन अरिजीत सिंग याने स्वतःच केलं आहे.

 

 

गाण्याचं शिर्षक ‘आर कोबे’ असं आहे. याचा अर्थ ‘हे सर्व कधी संपणार…’ पूर्ण गाण्यामध्ये हाताची मुठ दिसत आहे. ज्यावर गाण्याचं शिर्षक ‘आर कोबे’ असं लिहिलं आहे. गाणं सोशल मीडियावर पोस्ट करत अरिजीत सिंग याने कॅप्शनमध्ये, ‘हे गाणं फक्त अंदोलनासाठी नाही तर, करावाई करण्यासाठी आवाहन आहे..’, सध्या अरिजीत याचं गाणं चर्चेत आहे.

गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अनेकांनी अरिजीत सिंग यावर टीका केली आहे. अरिजीत सिंग याने प्रतिक्रिया देण्यासाठी इतका वेळ का लावला? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केली आहे. तर दुसरीकडे अनेकांनी अरिजीत सिंग याचं कौतुक केलं आहे.

एका नेटकरी अरिजीत सिंग याने गायलेलं गाणं शेअर करत म्हणाला, ‘आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी गाणं लिहिलं आहे. हे फक्त एक प्रोटेस्ट गीत नाही तर, कारवाई करण्यासाठी केलेलं आवाहन आहे..’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सुंदर गाणं…’ सध्या सर्वत्र अरिजीत सिंग याने गायलेल्या गाण्याची चर्चा रंगली आहे.