मुंबई : नुकताच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोनम कपूर हिने आयोजित केलेल्या पार्टीला पोहचले. आता या पार्टीतील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिने या पार्टीमधील अत्यंत खास असे पाच फोटो शेअर केले. मात्र, या पाचपैकी सर्वात शेवटच्या फोटोची तूफान चर्चा ही रंगताना दिसतंय. या फोटोमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघेही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. दोघांची जोडी गोड दिसत आहे. आता हीच पोस्ट व्हायरल होत आहे.
सोनम कपूर हिने तिच्या घरी डेविड बेकहम याच्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. डेविड बेकहम हा सध्या भारत दाैऱ्यावर आहे. सोमन कपूर हिने आयोजन केलेल्या या पार्टीमध्ये कपूर फॅमिली मोठ्या प्रमाणात दिसली. अर्जुन कपूर याच्यासोबत मलायका देखील या पार्टीमध्ये सहभागी झाली. मलायका अरोरा हिने डेविड बेकहम याच्यासोबतचे देखील खास फोटो शेअर केले.
एका फोटोमध्ये मलायका अरोरा ही डेविड बेकहम याच्यासोबत गप्पा मारताना देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये वेगळे लोक दिसत आहेत. ही पोस्ट मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याच्यासह सोनम कपूर हिला देखील शेअर केली. अर्जुन कपूर आणि मलायका हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.
मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. मुळात म्हणजे मलायका अरोरा हिने शेअर केलेली प्रत्येक पोस्टची वाऱ्यासारखी व्हायरल होते. चाहत्यांसाठी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच मलायका अरोरा ही दिसते.
मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला बाॅलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एका गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसले. तसेच मलायकाच्या वाढदिवसाच्या दिवशी खास पोस्टही अर्जुन याने शेअर केली.