अर्जुन कपूर याने शेअर केला मलायका अरोरा हिच्यासोबतचा ‘तो’ रोमँटिक फोटो, थेट म्हटले, बेबी…

| Updated on: Oct 23, 2023 | 7:47 PM

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सतत रंगताना दिसली. त्यानंतर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे मुंबईमध्ये स्पाॅट झाले. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकमेकांना डेट करत आहेत.

अर्जुन कपूर याने शेअर केला मलायका अरोरा हिच्यासोबतचा तो रोमँटिक फोटो, थेट म्हटले, बेबी...
Follow us on

मुंबई : मलायका अरोरा हिचा आज 48 वा वाढदिवस आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) हिला सकाळपासूनच चाहते हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही नेहमीच खास बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका अरोरा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना देखील दिसते. नेहमीच जीम बाहेर ती स्पाॅट होते.

मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अर्जुन कपूर याला डेट करतंय. मात्र, अनेकदा यांची जोडी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे अर्जुन कपूर याने काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.

मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूर याने एक अत्यंत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोसह त्याने एक खास कॅप्शन देखील शेअर केलंय. अर्जुन कपूर याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी…हा फोटो आपला आहे, तुझे हसू, आनंद, प्रकाश घेऊन येते, नेहमीच तुझी साथ देईल.

अर्जुन कपूर याने शेअर केलेला हा फोटो अत्यंत खास आहे. या फोटोमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. आता चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. बाॅलिवूडच्या देखील अनेक कलाकारांनी मलायका अरोरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई मलायका अरोरा ही होणार आहे. या चर्चांवर अर्जुन कपूर हा संतापल्याचे बघायला मिळाले. अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चांगलाच समाचार हा घेतला. टिका करणाऱ्यांना खडेबोल सुनावताना अर्जुन कपूर हा दिसला.