मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच कंगनाने तिचा फर्स्ट लूक शेअर करताना चित्रपटाची तारीख देखील जाहीर केली होती. या चित्रपटात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्याने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अर्जुन रफ आणि टफ लूकमध्ये दिसत आहे. (Arjun Rampal shared a poster of Dhaakad movie)
Boom ? Evil has a new name- Rudraveer! an antagonist who is dangerous, deadly and cool at the same time! @SohamRockstrEnt‘s #Dhaakad? in cinemas on 1st October 2021! @KanganaTeam @DeepakMukut @RazyGhai #sohelmaklai @divyadutta25 @castingchhabra @rajiv_gmenon @writish pic.twitter.com/Grjy7uO4FM
— arjun rampal (@rampalarjun) January 19, 2021
हे पोस्टर शेअर करताना अर्जुन रामपालने लिहिले की बूम, बुराइचे दुसरे नाव आहे रुद्रवीर, धाकड चित्रपट ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. पोस्टरमध्ये अर्जुनच्या हातात बंदूक दिसत आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत होते. हे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले होते की, ‘ निर्भय आणि क्रूर आहे. भारताचा पहिला महिला लीड अॅक्शन चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होईल.
कंगना सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड (Dhaakad) चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अॅक्शन सीन येथे शूट करत आहे.
संबंधित बातम्या :
Sexual harassment : शर्लिन चोप्राकडून लैंगिक शोषणाचा आरोप; साजिद खानच्या अडचणीत पुन्हा वाढ
Adipurush | सैफ अली खान आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे मोशन कॅप्चर सुरू!
अली अब्बासने माफी मागून काही फायदा नाही, तांडवविरोधात FIR दाखल!
(Arjun Rampal shared a poster of Dhaakad movie)