बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. अरमान मलिक हा बिग बॉसमध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे अरमान मलिक हेच आहे. अरमान हा बिग बॉसमध्ये आपल्या दोन्ही पत्नीसोबत सहभागी झाला. मात्र, पायल ही घराबाहेर पडलीये. अरमानची दुसरी पत्नी कृतिका हिच्याबद्दल विशाल पांडे याने हैराण करणारे भाष्य केले होते. ज्यानंतर पायल हिने बिग बॉसच्या मंचावर येत विशाल पांडे याची पोलखोल केली. सतत विशाल पांडे याचे चाहते हे पायल मलिक हिला तेंव्हापासून टार्गेट करताना दिसत आहेत. पायल हिच्याबद्दल चुकीच्या कमेंट केल्या जात आहेत.
फक्त पायल हिच नाहीतर तिच्या मुलाला देखील टार्गेट केले जात आहे. अनेकांनी म्हटले की, अरमान मलिक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच पायल मलिक ही प्रेग्नंट होती. यामुळेच अरमान मलिक याने तिच्यासोबत लग्न केले. पायल आणि अरमान यांच्या पहिल्या मुलाचे नाव चीकू आहे. लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट असल्याची सतत चर्चा असतानाच आता त्यावर पायल हिने खुलासा केलाय.
पायल मलिक ही म्हणाली की, मी आणि अरमान 2011 मध्ये भेटलो आणि त्यानंतर आम्ही कोर्ट मॅरेज केली. माझा पहिला मुलगा चीकू याचा जन्म 2016 मध्ये झाला. पायल म्हणाली की, माझ्या आणि अरमानच्या लग्नाला आता 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. तुम्ही ज्या मुलाबद्दल हे सर्वकाही बोलत आहात की, तो नाजायज आहे वगैरे पण तो छोटा मुलगा आहे आणि त्याला हे काहीच कळत देखील नाही.
पुढे पायल मलिक ही म्हणाली की, चीकू हा अरमान मलिकचा मुलगा आहे आणि ही गोष्टी माझ्या घरच्यांना माहिती आणि संपूर्ण कुटुंबाला. आता तुमच्यासाठी मी DNA टेस्ट करू का? हेच नाहीतर माझ्या जुळ्या लेकऱ्यांबद्दल देखील हे बोलले जात आहे की, हे जुळे लेकरं माझे नसून दुसऱ्या कोणाचेतरी आहेत. आता त्याबद्दलही तुम्हाला कागदपत्रे देऊ का?
गेल्या काही दिवसांपासून पायल मलिक हिला ट्रोल केले जात आहे. ट्रोलर्सला उत्तर देतानाही पायल मलिक ही दिसत आहे. पायल मलिक ही आता चारही लेकरांना सांभाळताना दिसत आहे. शिवाय घरातील सर्व कामेही पायल करत आहे. बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझही बघायला मिळतंय.