Bigg Boss OTT 3: अभिनेते अनिल कपूर होस्टेट ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो आता संपला आहे. शोमुळे सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायकांची… अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीचं नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचं नाव कृतिका मलिक आहे. शोमध्ये अरमान याने दोन्ही पत्नींसोबत एन्ट्री केली. ज्यामुळे तिघांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला. तिघ्याच्या आयुष्यातील खासगी मुद्दे देखील जगासमोर आले. सोशल मीडियावर देखील तिघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ झाले आणि होत असतात.
होणाऱ्या ट्रोलिंगचा कोणताच परिणाम मलिक कुटुंबावर झाली नाही. आता देखील मलिक कुटुंबाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. मलिक कुटुंबियांनी नवं घर खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती कृतिका आणि पायल यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून दिली.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अरमान आणि पायल म्हैसूर याठिकाणी गेले होते. तेथील दोघांचे रोमँटिक फोटो देखील व्हायरल झाले होते. पायल घरी परतल्यानंतर एक व्लॉग शेअर केला. व्लॉगमध्ये पायल म्हणते, ‘कृतिका म्हैसूर खूप छान आहे. तेथे प्रचंड ग्रिनरी आहे. मुलं देखील म्हैसूरमध्ये आनंदी राहतील… लवकरच आपण तिकडे शिफ्ट होऊ…’
कृतिका आणि पायल व्लॉगमध्ये म्हणतात, ‘आम्ही लवकरच चंदीगड येथील घर सोडून म्हैसूर येथे शिफ्ट होणार आहोत…’ पण यावर अरमान याने कोणती अधिकृत घोषणा केली नाही. पण कृतिका आणि पायल व्लॉगवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
एक नेटकरी म्हणाला, ‘अरमान मलिक त्याचे 6 फ्लॉट विकून म्हैसूर येथे शिफ्ट होणार आहोत?’, अरमान मलिक 7 घरांचा मालक आहे. आता त्याने सोशल मीडिया स्टारने आठवं घर विकत घेतलं आहे. म्हणजे घर कोट्यवधींचं असेल… बिग बॉसमधून गडगंज पैसे कमवून मलिक कुटुंब घर परतलं आहे… असं देखील नेटकरी म्हणते आहेत.
सोशल मीडियावर मलिक कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अरमान मलिक याने पहिली पत्नी पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर तिघांमध्ये अनेक वाद झाले… अखेर पाल हिने परिस्थितीचा स्वीकार करत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसमध्ये अनेकदा पायल खासगी आयुष्याबद्दल बोलली आहे.