अरमान मलिक याच्या दुसऱ्या पत्नीला मिळाली अत्यंत मोठी ऑफर, कृतिका आता थेट…

| Updated on: Aug 07, 2024 | 1:47 PM

अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाले होते. मात्र, यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हेच नाही तर अनेकांनी थेट निर्मात्यांनाच टार्गेट करण्यास सुरूवात केली होती.

अरमान मलिक याच्या दुसऱ्या पत्नीला मिळाली अत्यंत मोठी ऑफर, कृतिका आता थेट...
Armaan Malik
Follow us on

बिग बॉस ओटीटी 3 चे सीजन नुकताच संपले आहे. बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता सना मकबूल ही झालीये. सना मकबूल ही विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सना मकबूल ही बिग बॉसच्या घरात काही खास खेळताना दिसली नाही. सर्वांनाच वाटत होते की, रणवीर शाैरी हे बिग बॉस ओटीटीचे विजेता होतील. सुरूवातीपासूनच चांगला गेम खेळताना रणवीर शाैरी हे दिसले. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला होता. पायल ही सुरूवातीलाच बाहेर पडली. मात्र, अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही टॉप 5 पर्यंत पोहोचली होती.

नुकताच तब्बल 40 दिवसांनंतर कृतिका ही आपल्या चार लेकरांना भेटली आहे. मलिक कुटुंबिय हे आनंदात आहेत. कृतिका आणि अरमान मलिक हे बिग बॉसच्या घरात असताना पायल हिने अरमानसोबत घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले होते, यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर पायल हिने स्पष्ट केले की, आपला निर्णय चुकीचा होता.

आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका हिला बिग बॉस सीजन 18 ची ऑफर आलीये. व्लॉगमध्ये याबद्दल खुलासा करताना पायल मलिक ही दिसत आहे. पायल हिने म्हटले की, गोलूला बिग बॉस 18 ची ऑफर आलीये. मात्र, गोलू ऐवजी मी बिग बॉसमध्ये जाणार आहे.

पायलचे हे बोलणे ऐकून लगेचच कृतिका ही म्हणते की, बिग बॉसकडून माझे नाव ऐकायला मला खूप जास्त आवडते. मला जायचे आहे बिग बॉसच्या घरात परत एकदा. आता याचाच व्हिडीओ व्हायरल होतोय. खरोखरच कृतिका मलिक हिला बिग बॉस 18 ची ऑफर आली का? हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

कृतिका मलिक ही चांगला गेम खेळताना बिग बॉसच्या घरात दिसली होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी देखील तिला चांगले प्रेम दिले. कृतिका मलिक ही अरमान मलिक याची दुसरी पत्नी आहे. पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेताच अरमान मलिक याने कृतिका मलिक हिच्यासोबत लग्न केले. हे तिघी बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचल्यानंतर यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली होती.