अखेर घटस्फोटावर कृतिका मलिक हिचा मोठा खुलासा, म्हणाली, पायल हिला…

| Updated on: Aug 05, 2024 | 12:51 PM

बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले नुकताच झालाय. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद देखील मिळाला. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटीची विजेता झालीये. मात्र, सना हिच्या विजयानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.

अखेर घटस्फोटावर कृतिका मलिक हिचा मोठा खुलासा, म्हणाली, पायल हिला...
Armaan Malik
Follow us on

नुकताच बिग बॉस ओटीटी 3 चे सीजन संपले आहे. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटीची विजेता ठरलीये. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटीची विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण बिग बॉसच्या घरात काही खास गेम खेळताना सना मकबूल ही दिसली नाही. रणवीर शाैरी बिग बॉस ओटीटी 3 चे विजेते होणार असे सर्वांनाच वाटले. सुरूवातीपासूनच बिग बॉसच्या घरात चांगला गेम खेळताना रणवीर शाैरी दिसले. मुळात म्हणजे बिग बॉस ओटीटीचे हे सीजन नक्कीच हीट ठरले. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात दाखल झाला. अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर निर्मात्यांवरही जोरदार टीका करण्यात आली.

पायल मलिक ही बिग बॉसच्या घरातून लवकर बाहेर पडली. अरमान मलिक आणि कृतिका हे शेवटपर्यंत राहिले. हेच नाही तर कृतिका मलिक ही चक्क टॉप 5 पर्यंत पोहोचली. मात्र, कृतिका आणि अरमान मलिक हे बिग बॉसच्या घरात असताना पायल मलिक हिने अत्यंत मोठा निर्णय घेतला होता. पायल मलिक हिच्या निर्णयानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

सतत लोक टीका करत असल्याने आणि घाणेरड्या कमेंट करत असल्याने पायल मलिक हिने अरमानसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. कृतिका ही बिग बॉसच्या घरात असताना तिला सांगण्यात आले की, काही गोष्टीमुळे पायल मलिक ही अरमान याच्यासोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. हे ऐकल्यानंतर कृतिका ही रडताना देखील दिसली. 

आता कृतिका ही बिग बॉसमधून बाहेर पडलीये. कृतिका हिने नुकताच एक मुलाखत दिली. कृतिका म्हणाली की, मी जेंव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आणि सर्वात अगोदर पायलला विचारले तू ठीक आहेस ना? यावर पायल हो म्हणाली, त्यावेळी मला बरे वाटले आणि आता सर्व ठिक असल्याचे समजले. 

आम्ही जे सुरूवातीच्या दिवसांमध्ये सहन केले ते परत नव्हते पाहिजे. मुळात म्हणजे खूप वाईट काळ आम्ही तिघांनी बघितला आहे. एक वेळ अशी आली होती की, आम्ही स्वत: ला संपवण्याचा देखील निर्णय घेतला होता. अरमान मलिक आणि त्याचे कुटुंबिय व्लॉगच्या माध्यमातून आपल्या लाईफबद्दल प्रत्येक अपडेट शेअर करतात. काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, तो 200 कोटी संपत्तीचा मालक आहे.