मुंबई : अभिनेता अर्शद वारसी (arshad warsi) याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण अभिनेत्याला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. सिनेमातील अभिनेत्याच्या सर्किट या भूमिकेने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. अर्शद कायम त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातील काही सीन आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर अर्शद वारसी याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण आता अर्शद वारसी याची चर्चा रंगत नसून अभिनेत्याच्या लेकीची चर्चा तुफान रंगत आहे. अर्शद वारसीच्या लेकीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याच्या लेकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फिकं पडेल.
अर्शद वारसी याच्या लेकीचं नाव झेन झो वारसी (Zene Zoe Warsi) असं आहे. अर्शद त्याचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेवतो. पण आता त्याच्या लेकीचा आणि पत्नीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्याची लेक आईसोबत पोझ देताना दिसत आहे.
फोटो व्हायरल होताच चाहत्यांना झेन झो वारसी अर्शदची मुलगी आहे यावर विश्वासच बसत नव्हता. या फोटोमध्ये झेन आई मारियासोबत लेहेंगा घालून पोझ देताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘मुन्नाभाई MBBS’ फेम सर्किटची लेक एक नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
अर्शदच्या पत्नी आणि मुलीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी फोटोंवर कमेंट करत म्हणाला, ‘आम्हाला माहितीच नव्हतं अर्शदची लेक इतकी सुंदर दिसते…’ तर दुसरा नेटकरी फोटोंवर कमेंट करत म्हणाला, ‘सुंदर आई – लेक…’ सध्या दोघींच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत..
अर्शद वारसी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याची ‘असुर 2’ वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझन हिट झाला होता, तर दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तुम्ही अभिनेत्याची सीरिज jio सिनेमावर पाहू शकता. सीरिजमध्ये अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगत आहे.
अर्शद कायम त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी अभिनेत्याने अनेक गोष्टींचा सामना केला. अभिनेत्याने डान्सर म्हणून स्वतःच्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज अर्शद बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.