Arshad Warsi And Jaya Bachchan : ‘असुर 2’ मधील दमदार अभिनयासाठी अभिनेता अर्शद वारसीचे (Arshad Warsi ) सध्या खूप कौतुक होत आहे. याचदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत अर्शदने असा खुलासा केला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अर्शदने सांगितलेला हा किस्सा ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (jaya bachchan) यांच्याशी संबंधित आहे. डेब्यु फिल्मसाठी (तेरे मेरे सपने) अर्शद जेव्हा जया बच्चन यांना पहिल्यांदा भेटला, तेव्हा तो खूपच घाबरला होता.
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अर्शदने सांगितले की, दिग्दर्शक जॉय ऑगस्टीनने त्याला एक चित्रपट ऑफर केला होता, जो ABCL (अमिताभ बच्चन यांची निर्मिती कंपनी) साठी बनवला जात होता. आपण आधीच प्रॉडक्शन हाऊसशी बोललो असून आणि अर्शदने त्याचे फोटो त्यांना पाठवावेत अशी त्यांची इच्छा असल्याचेही दिग्दर्शकाने त्याला सांगितले होते.
अर्शदला अभिनेता बनण्यात नव्हता रस
पण हे ऐकल्यावर अर्शदने सरळ नकार दिला मी अभिनय वगैरे करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही असं (फोटो पाठवण्यास सांगणे) करू नका, असे अर्शदने स्पष्ट केले. पुढे अर्शद असंही म्हणाला की, इथे असे लोक येतात, ज्यांना चित्रपटात काम करायचं असतं पण त्यांना यश मिळत नाही आणि हे सर्वांना माहीत आहे. असे लोक रस्त्यावर दिसले की लोक त्यांची कीव करतात, म्हणतात, ‘ की बिचारा गावातून हिरो बनायला आला, पण यशस्वी झाला नाही. आता बघा कसा तो बसमध्ये प्रवास करत आहे. मला तसा माणूस व्हायचे नव्हते, अभिनय करण्यात रस नव्हता असं अर्शदने दिग्दर्शकासमोर स्पष्ट केलं होतं.
जया बच्चन यांच्याकडून ओरडा खाण्यास झाला तयार
मात्र त्यानंतर अर्शदला जया बच्चन यांचा फोन आला. त्यांनी अर्शदला ऑफिसमध्ये भेटायला बोलावले होते. ते ऐकून मला वाटलं होतं त्या मला काढून टाकतील ! मला वाटलं, ‘हम्म, ठीक आहे जया बच्चन.. त्या अमिताभ यांची पत्नी आहेत, एवढ्या मोठ्या अभिनेत्री आहेत, त्याच मला काढून टाकू देत. त्यांच्य तोंडून ओरडा ऐकायला लागेल, पण तोही माझ्या आयुष्यातील महत्वाचा अनुभव असेल. मीही कोणाला तरी किस्सा ऐकवेन की कस जया बच्चन य़ांनी मला झापलं, असा विचार करून मी त्यांना भेटायला गेलो, असंही अर्शद पुढे म्हणाला.
मला वाटलं त्या काढून टाकतील, पण तिकडे गेल्यावर त्यांनी मला हिंदी बोलता येतं का असं विचारलं. मी तर इंग्रजीत उत्तर दिलं की हो, मी हिंदी बोलू शकतो. मी तेव्हा खूप घाबरलो होतो. मग त्या म्हणाल्या, ठीक आहे.. तू हा चित्रपट करत आहेस. ते ऐकून मी अक्षरश: हैराण झालो ! आता सगळं संपलं असंच मला वाटलं. अशा शब्दांत अर्शदने त्याला पहिला चित्रपट कसा मिळाला, त्याची कहाणी सांगितली.
त्याला चित्रपटात कास्ट का केलं ? असं अर्शदने अनेक वर्षांनंतर जया बच्चन यांना विचारलं होतं. तेव्हा जया बच्चन म्हणाल्या की, तुम्ही पाठवलेल्या ३६ फोटोंमध्ये प्रत्येक फोटोत वेगवेगळे भाव होते. त्यावरूनच त्याची निवड करण्यात आली.