‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व हे घरातील सर्वच स्पर्धकांमुळे गाजलं. पण सर्वात जास्त चर्चा झाली ते निक्की तांबोळीच्या कानशिलात मारलेली आर्या जाधव. या प्रसंगानंतर तिला थेट शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असला तरी या प्रसंगानंतर तिचा चाहता वर्ग प्रचंड वाढला आहे. बिग बॉस’ संपलं असलं तरी आर्याची क्रेझ कमी होताना दिसत नाहीये.
आर्याकडून चाहत्यांसाठी नवीन सरप्राइज
तसं आर्या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव असते. ती तिच्या चाहत्यांसोबत अपडेट शेअर करतच असते. नुकतीच एक अपडेट आर्याने शेअर केली. ती अपडेट म्हणजे आर्याने अमरावती शहर सोडून ती दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली आहे. आर्याने नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांसोबत ही बातमी एका व्हिडीओद्वारे शेअर केली आहे.
अमरावतीची आर्या आता मुंबईकर
मुळची अमरावतीची असलेली आर्या आता मुंबईकर झाली आहे. ती मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे. आपल्या सामान शिफ्टिंगचा एक व्हिडीओ तिनं तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आर्या तिचं नवं घर सेटअप करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
आर्या जाधव ही उद्योजक हेमंत जाधव यांची मुलगी आहे. आर्याची आई रश्मी या गृहिणी असून, तिचा लहान भाऊ शिवराज हा इंजिनिअर आहे. आर्याचा स्वतःचा बॅंडदेखील आहे. QK नावाचा तिचा स्वतःचा बॅंड आहे. आर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे चाहते आता आर्याला नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
नवीन घराचा व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला लवकरच
आर्या जाधव तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी लाईव्ह येत आपल्या चाहत्यांशी सवांद साधते. तसेच ती तिने केलेले काही शायरी किंवा रॅपही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तिने असाच एक रॅप सादर करत निक्कीवरही निशाणा साधला होता. दरम्यान इथून पुढे आता आऱ्याचे लाइव्ह व्हिडीओ तच्या नवीन घरातून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार.