मुंबई | 5 डिसेंबर 2023 : सोशल मीडियावर कायम फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ असे असतात जे कायम लक्षात राहातात आणि कधीच विसरता येत नाही. एवढंच नाही तर, काही व्हिडीओ पाहिल्यानंतर जुना काळ आठवतो. आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो कधी विसरता येणार नाही आणि जुन्या, सोनेरी दिवसांची आठवण देखील करुन देईल. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि अभिनेत्री मुमताज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे डान्स करताना दिसत आहेत. ‘कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू…’, गाण्यावर आशा भोसले आणि मुमताज यांनी केलेला डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू…’ गाण्याला आज अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही हे गाण चाहते विसरू शकलेले नाहीत. ‘कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू…’, गाण्यावर आशा भोसले आणि मुमताज यांचा डान्स चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. चाहते व्हिडीओ पाहिल्यानंतर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सांगायचं झालं तर, आशा भोसले आणि मुमताज इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. दोघींच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात फार मोठी आहे. आशा भोसले आणि मुमताज यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर हाऊस पार्टीतील व्हिडीओ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आशा भोसले आणि मुमताज यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. दोघी आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा मुमताज यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं. आजही चाहते त्यांना विसरु शकलेले नाहीत. तर आशा भोसले यांनी गायिलेली गाणी आजही नवीचं वाटतात.
मुमताज यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. रोटी, दो रास्ते, आप की कसम, हरे रामा हरे कृष्ण, ब्रह्मचारी यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केले. मुमताज यांनी त्यांच्या करिअरमध्ये 100 हून अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आशा भोसले यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.