Asha Bhosle | ‘इंडस्ट्रीमधील मी शेवटची…’, आशा भोसले यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

| Updated on: Aug 09, 2023 | 9:42 AM

झगमगत्या विश्वातील दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायकांचं नाव घेत काय म्हणाल्या आशा भोसले? इंडस्ट्रीबद्दल त्यांनी केलं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र आशा भोसले यांची चर्चा...

Asha Bhosle | इंडस्ट्रीमधील मी शेवटची..., आशा भोसले यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
Follow us on

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : सिनेविश्वातील ‘मेलडी क्वीन’ आशा भोसले यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये गाणी गात प्रेक्षकांना आपल्या गोड आवाजाने मंत्रमु्ग्ध केलं. आशा भोसले यांच्या संगीत प्रवास वयाच्या १० व्या वर्षी सुरु झाला. आता आशा भोसले पुन्हा एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकताच झालेल्या एका पत्रकार परिषदेत आशा भोसले यांनी मोठा खुलासा केला आहे. ८ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने दुबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात खुद्द आशा भोसले गाणार आहेत… याच दरम्यान आशा भोसले यांनी, ‘मी इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे…’ असं मोठं वक्तव्य केलं. शिवाय बॉलिवूडच्या इतिहासाबाबत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आशा भोसले म्हणाल्या, ‘फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास फक्त मला माहिती आहे. अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी मी सांगत बसली तर तीन – चार दिवस लागतील.. दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायकांबद्दल मला सर्व काही माहिती आहे. अनेक गोष्टी आजही माझ्या मनात आहेत…’ असं देखील आशा भोसले म्हणाल्या…

 

 

आशा भोसले पुढे म्हणाल्या, ‘मी काहीही विसरलेली नाही. मला सर्व माहिती आहे. मी इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे..’ आशा भोसले यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आज आशा भोसले हे नाव फक्त भारतातच नाही तर, जगात प्रचंड मोठं आणि प्रसिद्ध नाव आहे. पण आशा भोसले यांनी देखील आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे. आशा भोसले १९६० मध्ये पतीपासून विभक्त झाल्या. त्यानंतर सहा वर्षात गणपतराव यांचं निधन झालं. त्यानंतर आशा भोसले यांनी एकट्यांनी मुलांचा सांभाळ केला.

आशा भोसले यांचा मोठा मुलगा हेमंत याचं २०१५ मध्ये कर्करोगामुळे निधन झालं. त्यांची मुलगी वर्षा हिने २०१२ मध्ये स्वतःला संपवलं. आशा भोसली यांनी लहान मुलहा आनंद एक सिनेमा निर्माता आहे. सध्या सर्वत्र आशा भोसले यांची चर्चा रंगत आहे.

‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए’ हे आशाताईंच्या आवाजातील गाणं ऐकताना काळीज चिरत जातं, तर ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ ऐकताना गलबलून येतं! ‘पिया तू अब तो आजा..’ अशा असंख्य गाण्यांना आशा भोसले यांनी आवाज दिला आणि बॉलिवूड गाजवलं…