‘या’ वर्षात शाहरुख आणि सलमान खानचा होणार मृत्यू? ज्योतिषाचा खळबळजनक दावा

| Updated on: Mar 08, 2025 | 1:14 PM

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एका ज्योतिषाने खळबळजनक खुलासा केला आहे. यामध्ये त्याने बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख आणि सलमान यांचा मृत्यू होणार असल्याचे खळबळजनक विधान केले आहे.

या वर्षात शाहरुख आणि सलमान खानचा होणार मृत्यू? ज्योतिषाचा खळबळजनक दावा
Shahrukh And salman khan
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us on

बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान ओळखले जातात. दोघेही बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवताना दिसतात. त्यांचा चाहता वर्ग हा केवळ भारतातच नाही पूर्ण जगभरात असल्याचे पाहायला मिळते. त्यांचे चित्रपट जगभरात तुफान कमाई करताना दिसतात. मात्र, एका मोठ्या सेलिब्रिटी ज्योतिषाने या दोन बड्या कलाकारांविषयी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. या ज्योतिषाने सलमान आणि शाहरुखच्या मृत्यूचे वय जाहिर केले आहे. नेमकं हा ज्योतिषी काय म्हणाला चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर नेहमीच सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखती चर्चेत असतात. तो अनेकदा बॉलिवूड कलाकरांनाच्या मुलाखती घेतो आणि त्यांना बोलतं करतो. या मुलाखतीमध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी अनेकदा समोर येतात. सिद्धार्थ कन्ननने नुकताच ज्योतिषी सुशील कुमार यांची मुलाखत घेतली. सुशील कुमार हे ज्योतिष विद्या आणि चान्गले नाडीचे अभ्यासक आहेत. त्यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक भविष्यवाणी केली आहे.

“सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांचेही आयुष्य खूप कमी आहे. सध्या सलमानचे वाईट दिवस सुरू आहेत तर शाहरुख खानचे सगळे काही ठीक सुरू आहे. पण येत्या काही काळात सलमान खानला एक असाध्या आजार होणार आहे. हे मी आधीही बऱ्याचदा सांगितला आहे. या आजारामुळे त्याला शेवटच्या काळातही प्रचंड त्रास होणार आहे ” असे सुशील कुमार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पुढे ते म्हणाले, ‘या दोन्ही स्टार्सचा मृत्यू एकाच वर्षी होणार आहे. त्यांचा मृत्यू हा वयाच्या ६७व्या वर्षी होणार आहे. त्यांचे ६७ वर्ष इतकेच आयुष्य आहे. वयाच्या त्याच काळाता त्यांचा मृत्यू आहे. मी ज्या विद्या शिकलो आहे त्यात मृत्यूची भविष्यवाणी एकदम अचूक करता येते.’ त्यांचे हे बोलणे ऐकून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकजण यावर कमेंट करताना दिसत आहेत. काहींनी कमेंट करत टीका केली आहे. एका यूजरने ‘कोणताही ज्योतिषी कोणाच्या मृत्यूची भविष्यवाणी करत नाही’ थेट असे म्हटले आहे.