आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांची जन्मोजन्मीसाठी गाठ बांधली जाणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा विवाह संपन्न होणार आहे. या लग्नाची आज देश-विदेशात चर्चा आहे. कारण फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी, कलाकार, उद्योजक या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. अनंत-राधिका यांच्या विवाह सोहळ्यात बऱ्याच गोष्टी भव्य-दिव्य, डोळे दिपवून टाकणाऱ्या आहेत. आज हे लग्न होत असलं, तर त्याचे विधी, अन्य फंक्शन बऱ्याच आधी सुरु झालेत.
काही महिन्यांपूर्वी जामनगरमध्ये प्री-वेडींग फंक्शन झालं होतं. जामनगरमध्ये रिलायन्सची कार्यालय, प्लान्ट आहे. जामनगरमध्ये तीन दिवस चाललेल्या या सोहळ्याला ग्लॅमर, उद्योग विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. जामगनरमध्ये झालेल्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात अनंत अबांनी होणारी पत्नी राधिका मर्चेंट बद्दल बोलले होते.
राधिकाबद्दल अनंत अंबानी काय म्हणालेले?
“आता मी राधिकाच्या विषयावर येतो. मी 100 टक्के नशिबवान आहे, यात अजिबात शंका नाही. मला माहित नाही, राधिका माझ्या आयुष्यात कशी आली?. मी खरच भाग्यवान आहे. राधिका माझ्यासोबत मागच्या सात वर्षांपासून आहे. मला आजही असं वाटत की, मी राधिकाला कालच भेटलोय. प्रत्येक दिवसागणिक माझं तिच्यावरच प्रेम वाढत चाललय. माझ्या बहिणीला डेट करत असताना मेहुणा म्हणायचा की, तिला पाहताच त्याच्या हृदयात ज्वालामुखी आणि कारंजे उफाळून यायचे. त्याचप्रमाणे मी म्हणेन की राधिकाला पाहिल्यानंतर माझ्या हृदयात भूकंप आणि त्सुनामी उफाळून येतात. राधिका तुझे मनापासून आभार” अशा शब्दात अनंत अंबानी यांनी राधिकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.