बॉलिवूडचं आकर्षण प्रत्येकाला असतं. बॉलिवूड सेलिब्रिटींची लाईफस्टाईल, महागड्या गाड्या, दिग्गज व्यक्तींसोबत असलेल्या ओळखी… सेलिब्रिटींच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहते आणि सोशल मीडियावर चर्चेत असतात. झगमगत्या विश्वातील सर्वात मोठी आकर्षणाची गोष्ट म्हणजे होणाऱ्या रॉयल पार्ट्या… बॉलिवूड पार्टी म्हटलं की अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी एकाच छताखाली येतात. इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या पार्ट्यांना फार महत्त्व आहे. सेलिब्रिटी याठिकाणी दारु पिण्यासाठी, मज्जा – मस्ती करण्यासाठी नाही तर, खास उद्देशाने येत असतात.
नुकताच झालेल्या मुलाखतीत, अभिनेता आणि दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने बॉलिवूड पार्ट्यांमध्ये काय होतं सांगितलं आहे. ‘बॉलिवूडमध्ये पार्टीमध्ये फक्त संपर्क वाढवण्यासाठी होत असतात. अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींना भेटून स्वतःची ओळख वाढवण्याचं काम बॉलिवूड पार्ट्यांमध्ये होत असते. मी सुद्धा पार्टी करतो, पण खास आणि जवळच्या लोकांसोबत पार्टी होते. इतर ठिकाणी फक्त सेलिब्रिटी स्वतःच्या कामासाठी पोहोचत असतात.’
‘बॉलिवूडमध्ये पार्टी असेल तर, ठरलेल्या ठिकाणी जायचं आणि दारुचा भरलेला ग्लास हातात आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत एकमेकांना विचारायचं कोणत्या सिनेमासाठी काम सुरु आहे. शुटिंग कुठपर्यंत पोहोचली आहे. ज्यामुळे आपली ओळख वाढेल आणि कामाच्या नव्या संधी मिळतील…’
‘मला सुरुवातील माहिती नव्हतं. म्हणून मी पार्टीमध्ये दारु प्यायचो. सर्वांसोबत काहीही बोलायचो. कारण तेव्हा माहिती नव्हतं नक्की काय बोलायचं आहे आणि काय नाही… त्यामुळे मी पार्टीमध्ये धम्माल करायचो…’ असं देखील रणदीप मुलाखतीत म्हणाला.
अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होती. सिनेमात रणदीप याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत होती. सिनेमात अभिनेता वीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसला, तर अंकिताने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.