Avatar 2: ‘जेम्स कॅमरूनचा अवतार 2 हा मास्टरपीसच’; चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू आला समोर

| Updated on: Dec 07, 2022 | 2:32 PM

'अवतार 2 हा पहिल्या भागापेक्षाही उत्तम'; प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

Avatar 2: जेम्स कॅमरूनचा अवतार 2 हा मास्टरपीसच; चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू आला समोर
Avatar: the way of water
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या हॉलिवूड चित्रपटाविषयी केवळ परदेशातच नाही तर भारतातही प्रचंड उत्सुकता आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार 2’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर लंडनमध्ये पार पडला. त्यानंतर हा चित्रपट माध्यमांना दाखवण्यात आला. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या प्रीमिअरनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. समिक्षकांना हा चित्रपट कसा वाटला, याची माहिती या पोस्टद्वारे मिळत आहे.

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाला समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेम्स कॅमरूनच्या कल्पनेतून उभारलेलं एक अनोखं विश्व आणि त्यातील व्हीएफएक्स पाहून प्रेक्षक थक्क झाले. आतापर्यंत सोशल मीडियावर ज्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या सकारात्मकच आहेत. जेम्सने पाण्याच्या आत एक वेगळं विश्व उभारलं आणि त्या अनोख्या विश्वाने प्रेक्षकांना भारावून टाकलं आहे.

हे सुद्धा वाचा

लंडन आणि इंग्लंडमधल्या समिक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी अनेकांनी अवतार 2 ची प्रशंसा केली आहे. ‘अवतार 2 हा अविश्वसनीय चित्रपट आहे. जेम्स कॅमरून हे या चित्रपटाची पातळी आणखी वर नेतील यावर मला विश्वास होता. हा अप्रतिम चित्रपट आहे’, असं एकाने लिहिलंय. तर पहिल्या भागापेक्षा हा दुसरा भाग आणखी चांगला असल्याचं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

अवतारचा पहिला भाग 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशाने सर्वांनाच थक्क केलं होतं. चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 19 हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. अवतार 2 हा त्याचा सीक्वेल आहे.

13 वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. इंग्रजीशिवाय हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अफाट बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट स्पेशल इफेक्ट्स, VFX आणि बॅकग्राऊंड स्कोरसाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करणार, असा अंदाज आहे.