मुंबई : अभिनेत्री आयेशा टाकिया हिने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये काम केलं. पण गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहे. चाहते कायम आयेशाच्या सौंदर्याचं आणि अभिनयाचं कौतुक करत असतात. पण अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाली आहे. तर आज जाणून घेवू आयशा नक्की करते तरी कायं. अभिनेत्री आयेशा टाकिया अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्रीने एकेकाळी सलमान खान स्टारर अॅक्शन थ्रिलर सिनेमा ‘वॉन्टेड’ मुळे तुफान चर्चेत आली होती. चाहत्यांनी नेहमीच तिच्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याची प्रशंसा केली, परंतु आयशा अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली. आयशा टाकियाशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया.
अभिनेत्री आयेशा टाकिया अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. आयेशा हिचा जन्म १० एप्रिल १९८५ साली एका गुजराती कुटुंबात झाला. वयाच्या १५ व्या वर्षी अभिनेत्रीने मॉडेलिंगसाठी सुरुवात केली. याच दरम्यान, आयेशा हिला प्रसिद्ध गुजराती गायक फाल्गुनी पाठक यांच्या एल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर अभिनेत्रीला अभिनय क्षेत्रातून अनेक ऑफर आल्या.
फाल्गुनी यांच्या ‘मेरी चुनार उड उड जाये’ या गाण्यात आयेशाचा निरागसपणा चाहत्यांच्या मनाला भिडला. त्यानंतर 2004 मध्ये वत्सल सेठसोबत ‘टारझन: द वन्डर कार’ या सिनेमातून आयेशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सिनेमानंतर काही वर्ष अभिनेत्री मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर आयेशाने ‘दिल मांगे मोर’, ‘सोचा ना था’, ‘दोर’, ‘नो स्मोकिंग’ असे अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली ती सलमान खानसोबतच्या ‘वॉन्टेड’ सिनेमाच्या माध्यमातून.
‘वॉन्टेड’ सिनेमानंतर आयेशा हिने फरहान आझमी यांच्यासोबत लग्न केल. लग्नानंतर अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर गेली. अभिनेत्रीने २००९ साली उद्योगपती फरहान आझमी यांच्यासोबत लग्न केलं. फरहान आणि आयेशा यांना एक ९ वर्षांचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर आयेशाने स्वतःचा धर्म देखील बदलला आणि इंडस्ट्रीपासून दूर झाली. सध्या अभिनेत्री कुटुंबाच्या व्यवसायाकडे लक्ष देत आङे.
आयेशाचा पती फरहान हा रेस्टॉरंटचा व्यवसाय करत आहे. त्यामुळेच आयेशानेही या कामात पतीला साथ द्यायला सुरुवात केली. आज आयशा पती आणि मुलासोबत मुंबईत राहत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटोही शेअर करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
इंटिमेट सिन्सच्या विरोधात आयेशा
आयेशा कधीही सिनेमांमध्ये इंटिमेट सीन करण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती. दिग्दर्शक नागेश यांच्या ‘आशेए’ सिनेमाला देखील आयेशाने इंटिमेट सिन्समुळे नकार दिला होता. त्याचवेळी अनुराग कश्यपच्या ‘नो स्मोकिंग’ या सिनेमात आयेशा अभिनेता जॉन अब्राहमच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. पण शूटिंगदरम्यान जेव्हा आयेशा हिला कळालं की, तिला सिनेमात जॉनसोबत काही इंटिमेट सीन द्यायचे आहेत, तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली आणि रडली. त्यानंतर अनुरागने आयेशाला समजावलं आणि सिन्समध्ये बदल केले.