मुंबई : नुकताच आता बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट सत्रामध्ये सहभागी झाला. आज या पर्वाचा दुसरा दिवस आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये अनेक मान्यवर हे सहभागी होताना दिसत आहेत. आज रात्री आठ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या सत्रात सहभागी होणार आहेत. आतापर्यंत अनेक बाॅलिवूड कलाकार हे या सत्रात सहभागी झालेत. रवीना टंडन तर या सत्रात थेट नेपोटिझमवरच बोलताना दिसली. आता आयुष्मान खुराना यानेही मनसोक्त गप्पा मारल्या आहेत.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्रात आयुष्मान खुराना हा चक्क आपल्या करिअरबद्दल आणि करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल थेट जाहिरपणे बोलताना दिसला. आयुष्मान खुराना म्हणाला की, मला माहिती होते की, पहिल्याच बाॅलमध्ये आपल्याला छक्का मारणे खूप जास्त आवश्यक आहे. आपल्याला दुसरी संधी ही मिळणार नाहीये.
माझा खरोखरच एक अभिनेता म्हणूनचा प्रवास खूप जास्त छान ठरला. मी विकी डोनरच्या अगोदरच्या तब्बल 6 चित्रपटांना थेट नकार दिला. मुळात म्हणजे मी खूप जास्त मेहनत घेतली, मीच नाही तर प्रत्यकेजण मेहनत घेतो. पण माझ्यावर नशीबानेच कृपा केली. यावेळी आपल्या सर्व यशाचे श्रेय आयुष्मान हा वडिलांना देताना दिसला.
आयुष्मान खुराना हा म्हणाला की, माझ्या वडिलांनी मला स्पष्ट आणि एकाच वाक्यात सांगितले होते की, जर तुला सुपरस्टार बनायचे असेल तर तुझ्याकडे सुपर स्क्रिप्ट असाल हवी. खरोखरच माझ्या वडिलांनी मला आशिर्वादच दिला. मला माझ्या वडिलांकडून खूप जास्त प्रेरणा ही मिळाली आहे. मी माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.
मी नक्कीच स्वत: ला खूप जास्त नशीबवान मानतो. पुढे आयुष्मान खुराना हा थेट प्रादेशिक चित्रपटांबद्दल बोलताना दिसला. हेच नाही तर थेट प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दलही आयुष्मान खुरानाने मोठे विधान केले. भाषेचे अडथळे संपल्याचे सांगतानाही आयुष्मान खुराना हा दिसला आहे. कांतारा चित्रपटाबद्दलही बोलताना आयुष्मान खुराना दिसला.