‘बाहुबली’ फेम अभिनेत्याने 47 व्या वर्षी बांधली लग्नगाठ

| Updated on: Nov 30, 2024 | 11:37 AM

बाहुबली या चित्रपटात कुमार वर्माची भूमिका साकारणार अभिनेता सुब्बाराजू लग्नबंधनात अडकला आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्याने लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

बाहुबली फेम अभिनेत्याने 47 व्या वर्षी बांधली लग्नगाठ
बाहुबली फेम अभिनेता सुब्बाराजूचं लग्न
Image Credit source: Instagram
Follow us on

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या दोन्ही चित्रपटांनी जबरदस्त कमाई केली होती. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘बाहुबली’मध्ये कुमार वर्माची भूमिका साकारणारा अभिनेता सुब्बाराजू याने वयाच्या 47 व्या वर्षी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. सुब्बाराजूने ‘बाहुबली’, ‘पोकिरी’, ‘मिर्ची’ यांसारख्या दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये काम केलंय. लग्नानंतर त्याने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

सुब्बाराजूने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. ‘अखेर लग्नगाठ बांधली’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये सुब्बाराजू त्याच्या पत्नीसोबत वरवधूच्या पोशाखातच समुद्रकिनारी उभा असल्याचं पहायला मिळतंय. लग्नासाठी दोघांनीही दाक्षिणात्य पोशाख परिधान केला असून गॉगल लावून त्यांनी ही खास पोझ दिली आहे.

हे सुद्धा वाचा

सुब्बाराजू हा आंध्र प्रदेशातील भीमावरम इथला आहे. सिनेसृष्टीत त्याने अनेक दमदार भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक कृष्णा वामसी यांच्या ‘खडगम’ या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. 2003 मध्ये ‘अम्मा नाना ओ तमिला अम्माई’ या चित्रपटामुळे तो प्रकाशझोतात आला होता. यामध्ये त्याने रवी तेजा आणि असीनसोबत काम केलं होतं. याशिवाय त्याने ‘आर्या’, ‘पोकिरी’, ‘बिल्ला’, ‘खलेजा’, ‘गीता गोविंदम’, ‘मजिली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

सुब्बाराजूने काही तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘ या हिंदी चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती. सुब्बाराजू हा ‘बाहुबली’मधील त्याच्या कुमार वर्माच्या भूमिकेसाठी जपानमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या भूमिकेला जपानी प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली.