Baba Siddique Death: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली आहे. पोस्टमध्ये सलमान खानसोबत कोणतंही युद्ध नको होतं, परंतु बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते… असं लिहिण्यात आलं आहे.
बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या फक्त राजकारणातील व्यक्तींसोबत ओळखी नव्हत्या तर, बॉलिवूडमध्ये देखील बाबा सिद्दीकी यांचा बोलबाला होता. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत बाबा सिद्दीकी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तर दुसरीकडे त्यांच्या शत्रूंची संख्या देखील फार मोठी होती.
बाबा सिद्दीकी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या भांडणांबद्दल आज सर्वांना माहिती आहे. बाबा सिद्दीकी आमदार झाल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. एकदा बाबा सिद्दीकी यांचे वाद दाऊद इब्राहिम याच्या जवळचा व्यक्ती अहमद लंगडा यांच्यासोबत झाले होते. तेव्हा दाऊदने बाबा सिद्दीकी यांना फोन केला होता… अशी देखील माहिती समोर आली होती.
रिपोर्टनुसार, तेव्हा दाऊद, बाबा सिद्दीकी यांना म्हणाला होता की, राम गोपाल वर्मा यांना फोन करेल आणि ‘एक था एमएलए’ असा सिनेमा तयार करायला लावेल… सांगायचं झालं तर, राम गोपाल वर्मा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहे आणि एक काळ असा देखील होता, जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची दहशत होती.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाबा सिद्दीकी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलीचं नाव अर्शिया सिद्दीकी असं असून त्या डॉक्टर आहेत. मुलगा झिशान सिद्दीकी 2019 मध्ये आमदार म्हणून निवडूण आले होते. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर पोलीस घटनेची कसून चौकशी करत आहेत.