Bacchan Pandey | शूटिंग 6 जानेवारीपासून सुरु होणार, जैसलमेरसाठी टीम पोहचली!

| Updated on: Jan 04, 2021 | 12:31 PM

साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांचा बच्चन पांडे (Bachchan Pandey) या मोठ्या चित्रपटाचे शूटिंग 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

Bacchan Pandey | शूटिंग  6 जानेवारीपासून सुरु होणार, जैसलमेरसाठी टीम पोहचली!
Follow us on

मुंबई : साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांच्या ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) या मोठ्या चित्रपटाचे शूटिंग 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कृती सैनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी असे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बच्चन पांडे चित्रपटाची संपूर्ण टीम जैसलमेरला रवाना झाली आहे, जिथे चित्रपटाचे शूटिंग 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे. (Bachchan Pandey film shooting from 6 January)

साजिद नाडियाडवाला यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत ज्यात या चित्रपटाची टिम दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये अक्षय कुमार दिसत नाही. बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत तर आणि कृती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे आणि जेंव्हा हे दोघे भेटतात तेंव्हात चित्रपटात खरा ट्विस्ट येतो.

‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. पंकज त्रिपाठी ‘सुपर 30′ आणि ’83’ नंतर आता बच्चन पांडेमध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रथमच एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत

अक्षय कुमारचा  ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील नवा लूक पाहून सर्वत्र त्याच्या लूक बद्दल चर्चा सुरु होती. या चित्रपटात अक्षयच्या गळ्यात मोठी चैन आणि काळी लुंगी घातलेली दिसत आहे. त्याच्या कपाळावरती चंदनचा टीळा आहे. तसेच अक्षयच्या हातात नान चाक दिसत आहे. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अक्षयने लिहिले की, साजिद नाडियावाला यांच्या येणारा चित्रपट बच्चन पांडे

संबंधित बातम्या :

मुंबई पोलिसांसाठी सेगवेचे अक्षय कुमारच्या उपस्थिती लॉन्चिंग, मात्र चर्चा अक्षयच्या खास ट्राऊझरची!

New Entry | नव्या वर्षात धमाका करायला ‘दीपिका पादुकोण’ तयार, या चित्रपटातून येऊ शकते प्रेक्षकांच्या भेटीला!

(Bachchan Pandey film shooting from 6 January)