मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) मंगळवारी एका वेगळ्या घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली. अजय मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका व्यक्तीने अजयची गाडी अडवून शेतकरी आंदोलनावर भाष्य करायला सांगितले. त्या व्यक्तीचे नाव राजदीप सिंह असे असून यासर्व प्रकरणानंतर त्याला पोलिसांनी अटकही केली होती. (Bail to Rajdeep Singh who stopped Ajay Devgan’s car)
आता त्या व्यक्तीला जामीनावर सोडण्यात आले आहे. मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडियावर या व्यक्तीला सोडल्याची माहिती दिली आहे. राजदीप सिंहच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले तरी अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त केलं नाही म्हणून त्याने अजयची गाडी अडवून विचारण्याचा प्रयत्न केला.राजदीपने 15 ते 20 मिनिटे अजयची गाडी अडवून ठेवल्याचं समोर येत आहे.
त्याच्यासोबत असलेल्या राजदीपच्या मित्राने सांगितलं की, राजदीप फक्त अजयशी शेतकऱ्यांच्या हक्काप्रकरणी बोलण्यासाठी गेला होता. ‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटानंतर आणि संजय लीला भन्साळी आता परत एकदा गंगूबाई काठियावाडी चित्रपटात काम करणार आहेत. अजय देवगणने शनिवारपासून गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. याची माहिती स्वत: अजय देवगणने चाहत्यांसोबत शेअर केली होती.
अजय देवगणने सोशल मीडियावर संजय लीला भन्साळीसोबत एक फोटो शेअर करत लिहिले होते की, दोन दशकांनंतर संजयच्या सेटवर खूप चांगले वाटत आहे. 1999 चा सुपरहिट चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर तब्बल 22 वर्षांनी अजय देवगण आणि संजय लीला भन्साळीसोबत काम करत आहेत. या चित्रपटात अजय देवगनसोबत सलमान खान आणि ऐश्वर्या राॅय मुख्य भूमिकेत होते.
संबंधित बातम्या :
ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ
शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका
निक्की तांबोळीचे किस प्रकरणावर मोठे भाष्य, म्हणाली…
(Bail to Rajdeep Singh who stopped Ajay Devgan’s car)